पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ अपायमपि चिंतयेत् ' उपायांचा विचार करतांना त्यापासून कोणते अपाय होतील याचा देखील विचार अवश्य केला पाहिजे. हट्टानें कोणत्याहि गोष्टीला चिकटणे, आग्रहाने कोणतीहि गोष्ट करणे बरोबर नाही हे जाणून योग्य तें केले पाहिजे. - हिंदुस्थानांतील लोकांची हल्लींची स्थिति लक्षात घेतांर संसार दुःखा येवढे दुःख । लोकत्रयीं असेना ॥ दासबोध. असेच त्यांस वाटणे साहजीक आहे. आयुष्य क्षणभंगुर असून हे दुःख फार वेळ टिकणारे नाही व दुसऱ्या लोकी या दुःखाचा वचपा निघेल अशी आशा करणेच या लोकांना सुखकारक व सोईचे आहे. परंतु प्राचीन काळी जेव्हां देशाची निराळी स्थिति होती तेव्हां या वेदांत तत्वाचा या देशांत इतका पसारा नव्हता. अजरामरवत्प्राज्ञो विद्यां वित्तं च साधयेत् । क्षणशः कणशश्चैव विद्यां वित्तं च साधयेत् । द्वाहुडाविवयुध्येते पुरुषार्थों समासमौ । आत्मीयश्चान्यदायश्च जयत्यतिबलस्तयोः॥ प्राक्तनश्चैहिकश्चैव शाम्यत्पत्राल्प वीर्यवान् । किया बलाद्धस्पदीकार्या प्रत्यक्षादधिकानसा (चिंता ) म ही त्या वेळची ब्रीदवाक्ये होती. संसार करतांना माणसाने मी अमर आहे, मी अजर आहे असे समजावें. क्षणक्षणाने विद्या व कणाकणाने द्रव्याचा संचय करीत असावा. आपला प्रयत्न व दुसऱ्याचा प्रयत्न हे दोन एडके आहेत. त्यांत जो जास्त जोरदार असेल तो जिंकाल, पूर्वजन्मींचे कर्म व आज आपण करतो तें कर्म यांत में कमजोर असेल त्याचा नाश होईल. प्रत्यक्षापेक्षां भवितव्यता जोरदार आहे अशी काळजी करणें वाईट आहे. या बुद्धीला बलात्काराने ढकलून खाली पाडली पाहिजे इत्यादि. जन्मतः मनुष्य प्रयत्नवादी असून त्याची हिम्मत कमी झाली म्हणजे तो प्रारब्धवादी होतो. हल्लींची जी आपली हिंदी लोकांची समजूत आहे तिने मनुष्य गारठून जातो, त्याचा उत्साह नाहीसा होतो, आनंद मावळतो व तो हताश होतो. उष्ण हवेमुळे