पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण अकरावें सामाजिक सुधारणा प्रत्येक इसमाला नवीन स्वराज्यांत नागरिक या नात्याने आपले काम नीट व मनापासून करता यावे म्हणून हिंदी समाजाची हल्लींची रचना थोडीफार बदलली पाहिजे व तिचा विचार या भागांत करावयाचे योजिलें आहे. या सामाजिक सुधारणा करण्यापूर्वी निरनिराळ्या समाजांत कोणकोणत्या योजना व चाली आहेत व त्यांचा त्या समाजावर बरावाईट काय परिणाम झाला हे पाहून मग त्यांपैकी परिस्थिति व परंपरा यांना अनुरूप अशा चांगल्या सुधारणा मान उचलल्या पाहिजेत. याबाबद सुभाषितकारांचा खालील श्लोक नीट विचारपूर्वक मनन करण्यासारखा आहे. पुराणमित्येव न साधु सर्व न चापि सर्व नवमित्यवद्यं ॥ संतः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः॥ जुने म्हणून जे ते सर्वच चांगले असे नव्हे; त्याचप्रमाणे केवळ नवीन म्हणूनच एखादे चांगले असेंहि नव्हे. विचारी माणसे नीट पारख करून चांगले तें स्वीकारीत असतात; परंतु वेडे लोक मात्र लोक करतात म्हणून त्यांचे अनुकरण करीत असतात. संयुक्त संस्थानांनी दारूची पूर्ण हकालपट्टी केली आहे व दुसरे देश तसेंच करीत आहेत. आपले शास्त्रहि दारू पिऊ नये असे म्हणते तरी केवळ व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून देशांत दारूला गोंधळ घालूं देतां कामा नये, किंवा स्त्रीपुरुष संबंधाचें उपयुक्त ज्ञान सर्व देशांत फैलावत आहे व त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नांवाखाली वाटेल तसा गोंधळ घालण्यात येत आहे; किंवा भीक मागण्याची बंदी करण्यासाठी पाश्चात्यांत अनेक कायदे करून अनाथ-पोषण हे एक सरकारी खातेच झाले आहे व त्याचा खर्च सालोसाल वाढत असून अनाथत्व बंद होत नाही वगैरे गोष्टींचे परिणाम पाहून इष्ट तितक्याच सुधारणा आपण स्वीकारल्या पाहिजेत. 'उपायं चिंतयन्प्राज्ञः