पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १० ऱ्यांच्या बरोबर तज्ञ व खाजगी लोक यांची सांगड ठेवावी, व या सांगडकमेटीमार्फत सर्व कामे व्हावी. या कमेट्यांची एकी करण्यासाठी एक प्रांतिक मंडळ व त्यावर एक मध्यमवर्ती मंडळ निवडावें. या मंडळाने नेहमी नव्या योजना, सुचवीत व अंमलांत आणीत असाव्यात. अगदी फारच मोठे काम असले तर ते सरकारी अधिकारी यांचे हस्ते अगर यांचे देखरेखीखाली व्हावें. साधारण अशी सर्व कामें स्थानिक माणसे यांच्या मदतीने स्थानिक संस्थांनींच करून घ्यावीत. याप्रमाणे स्थानिक मांडवल, स्थानिक मजूर व स्थानिक संस्था यांच्या मार्फत पुष्कळ गोष्टी करतां येऊन नवीन उत्पन्नाच्या बाबी निर्माण करता येतील. ही सुधारणा व शिक्षणपद्धति सर्वांत अत्यंत हितकर व कल्याणप्रद होईल. यायोगें लोकांत धमक, आत्मविश्वास व उत्साह वाढेल व याचा परिणाम पूर्ण स्वराज्य संपादनांत दृष्टोत्पत्तीस येईल. यात