पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वे.] साधनांत सुधारणा व पुढारी माणसे यांना एकत्र करून त्या त्या प्रदेशांतील गोष्टी जुटीने करणे कायद्याने भाग पाडले पाहिजे.. उदाहरणार्थ, एका जिल्ह्यांत खाणी संबंधीची संस्था स्थापावी, दुसऱ्यांत पाणी पुरवठ्यासाठी, तिसऱ्यांत पाटबंधाऱ्यासाठी, चवथ्यांत रेलवेसाठी, पांचव्यांत विजेच्या पुरवठ्यासाठी, सहाव्यांत मोटारयंत्रासाठी, कोठे जंगलसुधारणेसाठी, कोठे लोकोपयोगी कामासाठी, कोठे पाणचक्कयांसाठी व कोठे विविक्षित धंद्यांसाठी कमेट्या नेमाव्या, त्यांना अधिकार द्यावे, पैसे पुरवावे व कामें करणे व चालविणे भाग पाडावे, या कामासाठी लागणारे भांडवल व मजूर तथालच लावावे. त्या भागांतील तरुण, उत्साही व धनिक पदवीधरांकडून ही कामें कंत्राटाने करवावी. याप्रमाणे जरूर ते शिक्षण देऊन एकदां काम करण्याची संवय लागली, गोडी उत्पन्न झाली म्हणजे लोक ही कामे करण्यास शिकतील व कामे करण्यास योग्य होतील, अशा त-हेची शक्य तितकी कामें प्रत्येक जिल्ह्यांत काढली पाहिजेत, चालविली पाहिजेत म्हणजे हे एक उत्तम व्यावहारिक शिक्षण होईल, अशा त-हेची शिक्षणाची सोय केल्याशिवाय यापुढे एक दिवस देखील वाया जाता उपयोगी नाही. वर सांगितलेली कामें करण्याचे तीन प्रकार आहेत. (१) निव्वळ खाजगी व्यक्ति किंवा संस्थांकडून, (२) खाजगी व्यक्ति व सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने व (३) निव्वळ सरकारी नोकरांच्या मार्फतीने. या" कामांसाठी लागणारे मजूर, भांडवल व सूत्रधार मिळविले पाहिजेत. हल्लीच्या मोठ्या कारखान्यांतून मजूर व पैसे यांच्या इतकेच सूत्रधारत्वाचे महत्त्व आहे व या कामाचे शिक्षण पुष्कळ हिंदी लोकांना पाहिजे आहे. काहीं पाट, जंगल, रेलवे, ट्रामवे, वीज वगैरे कारखान्यांना लागणारे भांडवल स्थानिक लोकांकडून उसने म्हणून उभारतां येईल. हिंदी मजुरांना लोक कितीहि नांवे ठेवोत पण ही गोष्ट सिद्ध आहे की, हिंदी मजुरांना जर योग्य शिक्षण दिले व त्यांच्यांत योग्य नियमितपणा आणला तर सगळ्या कामांना पुरेसे मजूर व कारागीर हिंदुस्थानांत मिळू शकतील. प्रत्येक प्रांतांत त्या प्रांतांतील परंपरेचा उपयोग करणारें एक मंडळ नेमावें. प्रत्येक प्रांतांत होणा-या सुधारणेच्या कामावर वरिष्ठ अधिका