पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १० होते. (१) यामुळे एकाच रस्त्यावर मालाची गर्दी होते व (२) लोकांत नवीन मार्ग काढण्याची धमक नाहीशी होते. या धमकीमुळेच जगांत कितीतरी सुधारणा घडून येतात. वेळोवेळी जरूर त्याप्रमाणे रस्त्यांत सुधारणा न केल्या, तर शहरांत एकवटलेला सर्व व्यवहार एकाच मार्गात चोंदन जातो. यासाठी कडक असे रस्ते, जमीनीच्या आंतून व वरून जाणाऱ्या आगगाड्या, ट्रामवे व मोटारगाड्या व जनावरांच्या गाड्या या साधनांचा मोठ्या शहरांतून भरपूर पुरवठा पाहिजे. मुंबई व कलकत्ता या दोन शहरांत जमीनीखालून चालणाऱ्या आगगाड्यांची अवश्यकता भासते. याबाबद कलकत्त्यासाठी एक योजना केली असल्याचे ऐकिवात आहे. त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, अमदाबाद, नागपूर वगैरे शहरांतून आसपास जाणाऱ्या आगगाड्या पाहिजेत म्हणजे मजुरांना खेडेगांवांत मोकळ्या हवेत राहून शहरांत आपल्या धंद्यापुरतें जातां येतां येईल, या योजना मोठ्या खर्चाच्या असून धंदे व कारखाने यांची पुष्कळ वाढ होईपर्यत अमलांत येणाऱ्या नाहीत. देशांत लोखंडांचे कारखाने पुष्कळ होऊन लोखंडी सामान व यंत्रे येथे तयार होऊन वाटेल तशी व स्वस्त मिळू लागली म्हणजे या सुधारणा तेव्हांच होतील. batase नाहिंदुस्थानांत टपाल, तार व बोलणारी यंत्रे यांची वाढ पुष्कळ करतां येण्यासारखी आहे. यासाठी ही कामें सरकारने खाजगी कंपन्यांना करूं दिली पाहिजेत, व्यापाराच्या नफानुकसानीच्या बाबी, विकतां येणाऱ्या सुखसोईच्या बाबी, सरकारने खाजगी मंडळ्यांकडूनच करवाव्या म्हणजे त्यांत चढाओढ राहून लोकांच्या सुखसोईकडे योग्य लक्ष पुरविण्यांत येते. मात्र स्थानिक अधिकारी व सरकारी संस्था यांची या कामावर देखरेख पाहिजे, सगळ्यांत अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थानांतील लोकांची अक्कल व शक्ति यांचा सार्वजनिक कामाकडे उपयोग करणे ही होय. इतर सर्व सुधारणांपेक्षा या गोष्टीची सुधारणा अत्यंत महत्त्वाची व अत्यंत निकडीची आहे. हिंदुस्थान देशाची सुधारणा घडवून आणण्याच्या कामी सर्वथैव हिंदी अक्कल व शक्तीच वापरण्यात येईल अशी शक्कल काढली पाहिजे, येत्या दहावीस वर्षांत कायद्याने स्थानिक संस्थांवर या गोष्टीचा बोजा घालून हे काम करावे लागेल. स्थानिक प्रमुख व्यापारी