पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधनांत सुधारणा मां अनेक प्रांतांना जोडणाऱ्या मोठ्या रस्त्यांखेरीज बाकीचे सर्व रस्ते स्थानिक बोडोंच्या ताब्यात द्यावे. अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांबाबद या स्थानिक बोर्डीना प्रांतिक दळणवणाच्या बोर्डीनी सल्ला द्यावा व इतर प्रांतांशी यांनी पत्रव्यवहार करून एक शिस्त ठेवावी. अनेक प्रांतांना जोडणारे रस्ते या प्रांतिक बोडोंच्या ताब्यांत असावे. खेडेगांवास जोडणा-या गाडीवाटा ग्रामसंघांच्या ताब्यात द्याव्या. शेतांतून गांवांत मालं आणण्यासाठी लागणारे नवे रस्ते ग्रामसंघांनीच तयार करावे. लोकांना योडें प्रोत्साहान व मदत केली तर लोक कामें चांगली करतील. : हळूहळू असे दिवस येत आहेत की, ज्या दिवसांत बैलगाडीचा प्रवास म्हणजे मोठा कंटाळवाणा वाटेल. यासाठी चांगले रस्ते असणे एक अवश्य गोष्ट होईल. माल वाहून नेण्यास दोनचाकी बैलगाड्यांपेक्षां चारचाकी हलके गाडे जास्त सोईचे होतील व डोक्यावरून भारे आणण्यापेक्षां एकचाकी ढकलगाडीने माल नेणें अधिक फायदेशीर होईल व असल्या गाड्यांना हातभर रुंदीचे रस्ते पुरतील. या गाड्या बागाइतांच्या मधल्या बांधाने जातील. पुष्कळ नाल्यांवर पूल नाहीत. प्रत्येक जिल्ह्यांत कोठे पूल पाहिजेत याबद्दलची माहिती गोळा करून हे पूल बांधण्याची एक योजना तयार करावी. आणि स्थानिक बोडोंने दरसाल या कामाकडे विविक्षित रकमा खर्च करण्याचे ठरवावें. -हिंदुस्थानांत पाटांतून नावा जातील अशी सोय फारशी होण्यासारखी नाही. मात्र पूर्वबंगाल, ब्रम्हदेश व सिंघ या प्रांतांत अशी काही योजना करता येईल. मद्रास इलाख्यांत काही भागांत असें करतां येण्यासारखें आहे. यासाठी कोणत्या सोई आहेत व त्यांत कोणत्या सुधारणा करतां येतील याची चौकशी करून निर्णय करण्यास व तो अमलांत आणण्यास एक नाविक मंडळ नेमावे व त्याजकडे हे काम सोपवावें. ज्या ठिकाणी नावांतून माल नेण्याआणण्याची काही सोय आहे अगर होती तेथे आगगाड्या होऊन आगगाडीच्या हलक्या दरामुळे ही व्यवस्था मोडली आहे. याप्रमाणे गुजराथच्या किनाऱ्याचा सर्व जहाजांचा व्यापार मोडलाच आहे व तीच स्थिति कराची ते मुलतान व कलकत्ता ते अलाहाबाद ऊर्फ प्रयागची आहे. अशा व्यवस्थेमुळे लोकांचे दुहेरी नुकसान ___भा...हिं...स्व...११