पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १० जास्त लोक हिंदी व्यापारी पाहिजेत. रेलवेतील गरीब प्रवाशांना अन्न वगैरे सोई अधिक सवलतीने व ठरीव नियमांप्रमाणे मिळाल्या पाहिजेत, रेलवेला लागणारे सर्व सामान हिंदुस्थानांत तयार करावे व हिंदुस्थानांत विकत घ्यावे. गेल्या पंचवीस वर्षांत मोटारी ही नवीनच वाहने उपलब्ध झाली आहेत. या बाबींत संयुक्त संस्थानांत विलक्षण उत्क्रांति झाली आहे. त्या ठिकाणी दररोज लाखों मोटारी तयार करण्यांत येतात व त्यांची यंत्रे तर भलतींच स्वस्त आहेत. अमेरिकेच्या पश्चिमकिनाऱ्याकडे तर जनावरें दिसत नाहींशी झाली आहेत. नांगरापासून विमानापर्यंत अनेक कामांत मोटारयंत्रे वापरतात. दर आउ माणशी एक मोटार इतका तेथें मोटारींचा प्रसार झाला आहे. सन १९२० साली संयुक्त संस्थानांत शहात्तर लक्ष मोटारी होत्या व सगळ्या युरोपांत पांच लक्ष मोटारी होत्या, हिंदुस्थानांत तर त्यांची संख्या फारच थोडी होती. हिंदुस्थानांत देखील मोटारी करण्याचे कारखाने सुरू करून हिंदी प्रमुख व्यापाऱ्यांच्या सल्लयाने राकेल तेलावरील जकात बसविली तर हिंदुस्थानांत मोटारींचा प्रघात पुष्कळ वाढेल, सरकार योग्य सवलती देईल तर मोटारींचे हिंदी कारखाने आज सुरू होतील. येत्या दहा वीस वर्षांत हल्लींच्या मोटारीप्रमाणे विमानें ही रोजच्या व्यवहाराची गोष्ट होऊन बसेल, यासाठी हिंदी लोकांना विमाने तयार करण्याचे व चालविण्याचे शिक्षण आतांपासून दिले पाहिजे. इतर राष्ट्रांच्या मागे हिंदुस्थानाने रहातां कामा नये. या बाबींत हिंदुस्थानाला पुष्कळ सोई आहेत व त्यांचा योग्य उपयोग मनःपूर्वक केला पाहिजे. _व्यापार उदीम वाढण्यासाठी रस्ते चांगले असावे लागतात. हिंदुस्थानांत एकंदर दोन लाख मैल रस्ते आहेत. त्यापैकी पंचावन हजार मैल खडी घातलेले असून एक लक्ष पंचेचाळीस हजार मैल रस्ते बिनखडीचे आहेत. सन १९१७।१८ साली रस्त्यांकडे खालील रकमा खर्च झाल्या. लष्करचे सोईसाठी लष्करी रस्ते पन्नास लाख रुपये अनेक प्रांतांना जोडणारे मोठे रस्ते सहा लाख रुपये अनेक जिल्ह्यांना जोडणारे लहान रस्ते बावन्न लाख रुपये जिल्ह्याच्या जिल्ह्यांतील रस्ते दहा लाख रुपये