पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १० दिसणारे धंदे म्हणजे मीठ, मासे, मृगया, हे होत. हिंदुस्थानास पुरून उरेल इतकें मीठ हिंदुस्थानांत पैदा होण्यास कोणतीच अडचण नसावी. त्याचप्रमाणे मासे हिंदुस्थानच्या नद्यांत, तलावांत व समुद्रांत वाटेल तितके व वाटेल तसले निपजविण्यास काय हरकत आहे ? अशा रीतीने अन्नाचा एक मोठा पुरवठा होणार आहे. तसेच हिंदी जंगलांत इतक्या प्रकारचे पक्षी व 'प्राणी मिळतात की, त्यांची योग्य जोपासना व शिकार हा एक धंदा किंवा कारखाना होऊ शकेल. हल्ली हरणांचा व माकडांचा तर भलताच सुळसुळाट होऊन त्यापासून लोकांस त्रास होत असतो. हिंदुस्थानदेश हा एक बेट आहे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. जमीनीच्या अंगास जिकडे हा देश दुसऱ्या देशांना लागलेला आहे तिकडे उंच व दुलैध्य डोंगर अगर वाळवंट व जंगल असल्याने त्या बाजूंनी हिंदुस्थानांत फारशी रहदारी नाही. यासाठी परदेशाशी हिंदुस्थानाचा सर्व व्यवहार समुद्रांतून गलबतें वगैरेंच्या मार्फत होतो. हा व्यवहार सन १९१३।१४ साली दोन कोट टनांचा होता तो सन १९१७।१८ सालीं एक कोट टनांवर आला; पण याच चार सालांत कानडाचा व्यवहार तीन कोटी टनांवर गेला व या फरकाचे कारण हिंदुस्थानची स्वतःची गलबतें अगर आगबोटी नाहीत हे होय. हिंदुस्थानच्या समुद्र किनाऱ्याची लांबी साडेचार, पांच हजार मैल आहे व असे असून इतक्या विस्तारांत फक्त सहा सात चांगली बंदरे आहेत व आगबोटी तर सर्व परदेशी आहेत. परदेशांत बांधलेल्या पण हिंदुस्थानच्या मालकीच्या अशा आगबोटी शेकडा एकदोन सुद्धा नाहीत. यासाठी हिंदुस्थानांत आगबोटी बांधल्या पाहिजेत व हिंदी लोकांनी परदेशी आगबोटी खरेदी केल्या पाहिजेत व त्यांतून व्यवहार केला पाहिजे. सन १८५० साली हिंदी लोकांची चौतीस हजार गलबतें होती व त्यांतून दरखेपेस साडेबारा लक्ष टन माल जात असे. सन १९०० साली ही संख्या तीन हजारांवर येऊन तीतून फक्त एक लाख टन माल जाऊं येऊ लागला व आज पंचवीस वर्षांत हा व्यवहार इतका कमी झाला आहे की, हिंदुस्थानांत हल्ली स्वदेशी गलबतांचा व्यवहार नाहींच म्हटले तरी चालेल, सरकारने हिंदुस्थानच्या कल्याणासाठी गलबतें - व आगबोटी बांधण्याचे स्वतःचे कारखाने काढले पाहिजेत. परदेशांतून