पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधनांत सुधारणा सामान्य लोकांना समजेल अशी कोठेच उपलब्ध नाही. मग लोकांना त्यांत गोडी वाटेल, त्या ज्ञानाचा उपयोग करून दाखविण्यास वाव मिळेल, आपण अमुक करू असा हुरूप येईल अशा रीतीने ती शिकविणे तर लांबच राहिले. हिंदी खाणी खाजगी व्यक्ति किंवा कंपन्यांनी चालवाव्या पण त्यांची मालकी सार्वजनिक असावी अशी तजवीज झाली पाहिजे. प्रत्येक प्रांतिक सरकारला त्या त्या प्रांतांतील खनिज द्रव्य त्या त्या प्रांतांतील लोकांच्या कल्याणाच्या दृष्टीने मोकळेपणे काढण्याची व विकण्याची परवानगी पाहिजे. जपानी सरकारने पुष्कळशा खाणी पहिल्याने नमुना म्हणून स्वतः चालवून दाखविल्या. त्यांत त्यांनी परदेशीय भूगर्भज्ञ व खनिज शास्त्रज्ञ कामास लावले व त्या नीट चालल्यावर लोकांकडे, जपानी खाजगी कंपन्यांकडे वहितीस दिल्या. खाणींच्या कामाचे सर्व प्रकारचे ज्ञान मिळण्यासाठी त्याच्या शाळा व कालेजे पाहिजेत. त्यांत खाणीसंबंधी तात्वीक, शास्त्रीय व व्यावहारिक ज्ञान देण्यात यावे, तूर्त दोन तरी असली कालेजें मध्यप्रांत व बहारमध्ये पाहिजेत. त्याचप्रमाणे व-हाड बहार, वगैरे भागांत खाणांचे ज्ञान देणाऱ्या शाळा जिल्हाजिल्हीं पाहिजेत. याबाबद एक विस्तृत व व्यवस्थित योजना करून ती अमलांत आणली पाहिजे, प्रत्येक प्रांतांत एक खाणींचे खाते पाहिजे व त्या खात्याला एक एक हिंदी प्रतिनिधीचे सल्लागार मंडळ पाहिजे, याबाबद मध्यवर्ती सरकारने परदेशची माहिती गोळा करणे व देशाची सूक्ष्म पहाणी करणे ही कामे हाती घ्यावी. स्थानीक सविस्तर माहिती देणारी लहान लहान चोपडी व त्या खाणी कशा चालवाव्या याची माहिती देणाऱ्या तज्ञांच्या कचेऱ्या प्रांतिक सरकारांनी काढाव्या. हिंदुस्थानांतून परदेशी अशुद्ध धातू पाठविण्यापेक्षा ती शुद्ध करण्याचे कारखाने काढावे. याप्रमाणे तांब्याचे कारखाने कानडांत आहेत व जस्ताचे कारखाने आस्ट्रेलियांत आहेत व नीललोह (मांगानीज) चे कारखाने हिंदुस्थानांत हवेत. ग. हिंदुस्थानांत एकंदर किती प्रकारचे कारखाने काढतां येतील याची पहाणीच अद्याप केलेली नाही. यासाठी हिंदी लोकांचे एक मंडळ नेमून सर्व देशाची पहाणी केली पाहिजे. मुख्य चालण्यासारखे सहज