पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०१० तपशील प्रसिद्ध करावा म्हणजे याबाबद योग्य खबरदारी व काळजी घेण्यांत येते अगर कसें इकडे लोकांचे लक्ष राहील. - हिंदुस्थानांत पूर्वी खाणी पुष्कळ ठिकाणी होत्या व त्यांतून हिंदुस्थानास लागणारी सर्व खनिज द्रव्ये पुरविली जात. इंग्रजी राज्य झाल्यापासून या खाणी सर्व बंद पडल्या. लोकांना अवश्य त्या सवलती न दिल्यामुळे या खाणी बंद पडल्या व त्यानंतर युरोपीय कंपनीला त्याच सवलती देऊन या खाणी वहिवाटीस देण्यांत आल्या. कोलारची सोन्याची खाण, अजमीरजवळील तांब्याची खाण, ब्रह्मदेशांतील राकेलची खाण याप्रमाणे बंद पाडण्यांत येऊन नंतर युरोपीय कंपन्यांच्या मार्फत हल्ली चालत आहेत. हिंदी लोकांना याबाबद जगांत काय सुधारणा झाल्या याचा मागमूसच लागू देण्यांत येत नाही. यामुळे हिंदुस्थानांत सुरू असलेले तुरटी, पुष्कळ क्षार, मोरचूत, हिराकस, तांबे, शिसे, लोखंड, पोलाद, सोरा, व सवागी यांचे कारखाने बंद पडले आहेत. कित्येक कारखान्यांना उपद्रव्ये करण्याची परवानगी नाही म्हणून ते बंद पडले आहेत. उदाहरणार्थ तांबे काढतांना तेजाब करणे, साखर करतांना मळीची दारू करणे वगरे. हिंदुस्थानासारख्या विविध व अफाट देशाचे खाणींचे उत्पन्न १९१७ साली अवघे पंधरा वीस कोटी रुपयांचे होते. याच साली कानडांत साठ कोटी, जपानांत सत्तर कोटी व अमेरिकेतील संयुक्त संस्थानात सातशे कोटी रुपयांची खनिज द्रव्ये काढण्यात आली, हिंदुस्थानांतील खाणीतून १९१७ साली खालील द्रव्ये निघाली. यांत इंग्रज कंपन्यांनीच पुष्कळ काढलेली आहेत. दगडी कोळसा सात कोटो ) यांत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट सोने साडेतीन कोटी । ही की, समुद्रवेष्टित हिंदुस्थानांत नीललोह (मांगानीज) दोन कोटी । इंग्लंडांतून दोन कोटी रुपयांचे मीठ राकेल या दोन कोटी | आणावे लागले. ते सुद्धा येथे भरपूर मीठ एक कोटी काढलें नाहीं. हिंदुस्थानसरकारने व त्याचप्रमाणे हिंदी पुढाऱ्यांनी हिंदुस्थानांत खाणींचा धंदा वाढविण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. हिंदुस्थानसरकारने हिंदी भूगर्भ व भूस्तर शास्त्रांची माहिती गोळा केली आहे; पण ती