पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधनांत सुधारणा १५५ योग्य होते की कसे व होत नसल्यास काय करावे याचे विवेचन करणे कठीण आहे. तथापि हिंदुस्थानांतील कारखान्यांना मालाचा पुरवठा करून जास्त उत्पन्न या जंगलांपासून करता येईल असे आम्हांस वाटते. हल्ली हिंदुस्थानांतील जंगलांतून लोकांना इमारती लाकूड, जळाऊ सरपण, कागदाचा रांधा व तेल वगैरे किरकोळ वस्तु मिळतात. जंगल म्हणजे कांहीं खाण नव्हे. ते एक पीक आहे ही गोष्ट जंगलखात्याच्या अद्याप लक्षांत आलेली दिसत नाही. कारण जंगलांची वाढ होण्याऐवजी जंगले उजाड झालेलीच जास्त दृष्टोत्पत्तीस येतात, खाणीत माल वाटेल तितके दिवस पडला तरी चालतो पण शेतांतील पीक वेळच्यावेळीच काढले पाहिजे, पिकाची वरचेवर लागवड व पीक पिकतांच काढणे या गोष्टी कराव्या लागतात; तसें खाणींचे नसते, ही गोष्ट विसरून जंगलखाते लागवडीकडे व पीक वेळेवर काढण्याकडे लक्ष देतांना दिसत नाही. खाजगी संस्थांना लागवड करून उत्पन्न करण्यासाठी जंगले दिली तर त्यांची हल्लीच्या पेक्षा जास्त चांगली व्यवस्था राहील. योग्य प्रदेशांत विविक्षित कारखान्यांसाठी विविक्षित झाडांचीच लागवड व वाढ करण्यांत आली पाहिजे, कागदांचा राधा, आगपेट्या व काड्या, तरवडासारखी रंगाच्या उपयोगी झाडे यांच्यासाठी योग्य भाग राखून ठेवले पाहिजेत. अशा भागांजवळ हे कारखाने काढण्यास सवलती दिल्या, पाहिजेत. अशा रीतीने जंगलांची व्यवस्थित मांडणी व राखण करणे, त्यांच्या जोपासनेचे शिक्षण देणे व त्यांपासून दिवसेंदिवस जास्त व कायमचे उत्पन्न होईल अशी तजवीज करणे जरूर आहे. जंगलांची जोपासना वगैरे करण्याचे कामी सरकारी अधिकाऱ्यांबरोबर प्रांतिक व स्थानीक कमेट्या नेमाव्या, या कमेट्यांनी आपल्या कामाची माहिती गांवोगांव द्यावी व जंगल म्हणजे एक मोठी सार्वजनिक मिळकत आहे हे सर्वांस पटवून द्यावे. त्याचप्रमाणे या कमेट्यांनी अमक्या भागांत अमुक लांकड मुबलक होते व त्यावर अमुक कारखाना चांगला चालतो हे देखील लोकांच्या निदर्शनास आणून ते जंगल राखणे, त्याची वाट करणे व त्यावर कारखाना चालविणे ही कामें खाजगी संस्थांकडे सोपवावी. दरसाल कोणत्या जंगलांत, कोणत्या वस्तूचे किती उत्पन्न झाले याचा आंकडेवार