पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - १५४ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १० येत नाही. एकंदर पावसाचे पाणी पन्नास कोट घनफूट भरते व त्यापैकी अवघे सहा कोट घनफूट पाणी हल्लीच्या पाटबंधाऱ्यांत वापरण्यात येते. बाकीचे सर्व पाणी समुद्रांत वाया जाते. यापैकी काही पाणी अद्याप शेतीसाठी उपयोगी पडण्याजोगे आहे व ते अडवून पाटांतून शेतांत नेऊन सोडले पाहिजे. यापुढे दरसाल या नव्या होणाऱ्या व झालेल्या पाटबंधाऱ्यांची माहिती प्रांतिक सरकारांनी लोकांत प्रसिद्ध करावी. माल उत्पन्न करणारे कारखाने व तयार माल वाहून नेण्याची साधने यांची वाढ हल्ली स्वस्त सर्पणावर अवलंबून आहे. कारण ही कामें सध्या बहुधा वाफेने होतात व वाफ म्हणजे सर्पण होय. जगांत एकंदर सर्व कारखाने मिळून बारा कोटी अश्वशक्ति कामांत गुंतलेली आहे, त्यापैकी साडेसहा कोटी अश्वशक्ति कारखान्यांत गुंतलेली असून त्यापैकी दीड कोटी अश्वशक्ति एकट्या विलायत देशांत गुंतली आहे. कानडा देशांत दोन कोटी अश्वशक्ति पाण्यापासून उत्पन्न होण्यासारखी असून त्यापैकी तेवीस लक्ष अश्वशक्ति हल्ली कामी लागलेली आहे. हिंदुस्थानसरकारने देखील हिंढस्थानांत पाण्यापासून किती शक्ति निर्माण करण्यांत येण्यासारखी आहे याची पहाणी नुकतीच करविली व त्याबद्दलच्या माहितीचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे, त्यांच्या मते हिंदुस्थानांत पाण्यापासून बारा लक्ष अश्वशक्ति निर्माण करता येईल. हिंदुस्थानांतील सर्व पाऊस फक्त चार पांच महिन्यांत पडतो व शक्तीचा पुरवठा बाराहि महिने सारखा पाहिजे, यासाठी मोठी तळी बांधून हा पाऊस पडतो तेव्हां पडलेले पाणी सांठवून ते बाराहि महिने पुरवावे अशी योजना हिंदुस्थानांत करावी लागते. या पाण्याच्या शक्तीचा उपयोग म्हैसूर संस्थानांत म्हैसूर सरकारने व खंडाळ्याच्या घाटांत टाटा कंपनीने केला आहे, ही शक्ति हिंदुस्थानांत जागोजाग उत्पन्न करतां येण्यासारखी आहे व लोकांनी व सरकारने याबाबद झटून मेहनत करून योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. ___हिंदुस्थानसरकारचे ताब्यांत अडीच लाख चौरस मैल जंगल असून त्या जंगलापासून सन १९१८।१९ साली सरकारला दीड कोट रुपये उत्पन्न झाले. सरकारी जंगलखाते काय करते याची दाद सुद्धा लोकांना नाही व यासाठी हिंदुस्थानांतील जंगलांपासून काय उत्पन्न व्हावे, होते. ते.,