पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दहावें या साधनांत सधारणा हिंदुस्थानासारख्या उष्ण कटिबंधांतील व शेतीवर अवलंबून असणाऱ्या देशांत पाटबंधारे व कालवे यांचे महत्त्व किती आहे हे सांगावयास नको. पाणी नसल्यास गवताची काडी सुद्धां उगवणार नाही असे प्रदेश हिंदुस्थानांत आहेत. हा सगळा देश हल्ली देवमातृक किंवा निव्वळ पावसावर अवलंबून राहणारा आहे. त्याला प्रयत्नपूर्वक "नदीमातृक" म्हणजे पाटावर पोट भरणारा केला पाहिजे. एकंदर इंग्रजी हिंदुस्थानांत २३,००,००,००० एकर शेती आहे. त्यापैकी फक्त ४,८०,००,००० एकरांना पाणी मिळतें व यांपैकी २,६०,००,००० एकरांना पाणी सरकारी कालव्यांचे मिळतें व २,२०,००,००० एकरांना खाजगी तळी व विहिरीचे पाणी मिळतें. देशी संस्थानांत सुमारे ६०,००,००० एकरांना पाणी मिळते इंग्रजसरकरांनी जे कालवे वगैरे बांधले आहेत त्यांवर भांडवलखातीं व्याहात्तर कोटी रुपये खर्च झाला आहे व या बागाईत जमीनीतील पिकांची किंमत दरसाल सत्त्याण्णव कोटी आहे. यावरून हे दिसेल की, पाटबंधाऱ्याकडे खर्च होणारी रक्कम उत्पन्नांत भरून निघत असते. इतकेच नव्हे तर या कामांवर १९१८१९साली ८.१ टक्के व्याज पडले. त्याचा अर्थ असा होतो की, पाटपाण्याकडे शंभर रुपये खर्च केले तर दरसाल शंभर रुपयांचे पीक येते व शिवाय आठ टक्के व्याज पडते. असे असून आजपर्यंत इंग्रजसरकारने आगगाड्यांकडे तीनशे साठ कोटी रुपये खर्च केले, पण पाटबंधारे यांजकडे अवघे सत्तर ऐंशी कोट रुपये खर्च केले. हल्लींचे हिंदुस्थानसरकारचे पाट बंधाऱ्याचे धोरण सन १९०१ ते १९०३ यांच्या दरम्यान बसलेल्या इरिगेशन कमिशनने ठरविलेले आहे. या कमीशनचे असे म्हणणे आहे की, हिंदुस्थानांत जो पाऊस पडतो त्याचा एकअष्टमांश किंवा आठवा हिस्सा देखील पाटबंधाऱ्यांकडे वापरण्यांत