पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ भावी हिंदी स्वराज्य [प्र०९ येतांच माल मोजून गार्डाच्या डब्यांत देण्यात यावा व उतरल्या ठिकाणी त्याचे वजन, पैसे वगैरे द्यावे. अशी तजवीज केल्याने गाडीत चढतांना होणारी धांदल व त्रास पुष्कळ कमी होईल. तात्पर्य, थोड्या खर्चात व सुखाने प्रवास करण्याची साधने वाढली यहणजे लोक जास्त मुशाफरी करतील व त्यामुळे व्यापारास उत्तेजन येईल, धर्मशाळांत, बाजारांत, हंगामी प्रदर्शनवजा दुकाने काही दिवस सवलतीच्या दराने परप्रांतीय व्यापाऱ्यांना मांडूं द्यावी.