पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वे.] व्यापार, उदीम यांत सुधारणा पाहिजे ती म्हणजे हिंदी शौचकूप, बायकांच्या डब्यावर बायकांचे चित्र, आगगाडीत अन्नपाण्याची सोय व डब्यांत झोपी जाण्याची सोय, या बाबींत मधल्या बांकावर तीन मजले असलेले डबे साधारण बरे आहेत. तशीच व्यवस्था बाजूच्या बाकांना केली तर बरे होईल. खाण्यासाठी गाडीस एक निराळा डबा जोडून त्यांत निरनिराळ्या जातींना भात, भाजी व भाकरी बसून खाता येईल अशी सोय हवी. भाकरीऐवजी पुन्यांची व्यवस्था केली तर सर्व साधारण जातींची पहिल्याने सोय होईल व मग सर्व जातींची सोय होईल. मांसाहारी व शाकाहारी असे दोन भाग मात्र एकमेकांपासून अलिप्त असे पाहिजेत. याबाबद सरकारने रेलवेंना सक्त ताकीद दिली पाहिजे. रस्त्यांवर म्युनिसिपालिट्यांनी ही सोय वाटेवरील धर्मशाळांत करावी. काही दिवस यांत नुकसान होईल, पण लवकरच ही व्यवस्था अंगवळणी पडून प्रवासाची सोय वाढेल. ___ प्रवासाची सोय वाढल्यावांचून माणसांना प्रवास करण्याचा हुरूप येत नाही. प्रवास केल्याशिवाय माणसाची नजर फांकत नाही. व्यापाऱ्याने तर प्रवास अवश्य केला पाहिजे. प्रवासांत व्यापाऱ्याबरोबर मालाचे नमुने असल्यास त्यास रेलवेचे भाडे व जकाती याबाबद सवलत असावी. अशा सवलतीने व्यापार वाढण्यास फार मदत होईल. प्रत्येक मोठ्या स्टेशनावर तेथील म्युनिसिपालिटीने त्या गांवी धंदे व व्यापार याबाबद काय सवलती किंवा सोई आहेत, तेथे कोणता व्यापार विशेष चालतो व तेथून दुसऱ्या कोणत्या कोणत्या गांवीं सोईने जाता येईल ही माहिती फळ्यावर मोठ्या अक्षरांत द्यावी. प्रत्येक धर्मशाळेच्या रखवालदाराकडे एक एक पुस्तक असावें व त्यांत अशा त-हेची माहिती नमूद असावी. व्यापाऱ्याला जरूर ती माहिती रखवालदाराने द्यावी. धर्मशाळांच्या जमीनीत खोल पुरलेल्या कड्या असाव्या व या कड्यांना मुशाफरांनी आपले सामानाची पेटी साखळदंडाने बांधून ठेवावी. चोरी वगैरेपासून व्यापाऱ्यांचा बचाव व्हावा म्हणून धर्मशाळांत ही सोय पाहिजे त्याचप्रमाणे ती आगगाडीतहि पाहिजे, तसेच गार्डाच्या ताब्यांत माल देण्याच्या संबंधांत जास्त सवलत पाहिजे, स्टेशनवर