पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०९

  • प्रत्येक प्रांताच्या युनिव्हर्सिटीने व्यापारोपयोगी शिक्षणाची सर्व सोय मुबलक व मोकळ्या हाताने केली पाहिजे, सर्व शिक्षण देशीच भाषेतून द्यावयाचे असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा बोजा वाटणार नाही व शिक्षण सर्व त्यांस पूर्णपणे गळी उतरेल, धंदे व उद्योग यांबाबद अशीच शिक्षणाची सर्व सोय पाहिजे. प्रत्येक शहरांत व्यापार व उद्योगधंदे यांचे एक कालेज असावे व त्या कॉलेजांत, विशेषतः त्या जिल्ह्यांत चालणाऱ्या व्यापारधंद्याचे शिक्षण देण्यांत येऊन त्याच बाबींत परदेशांत किती व कशी प्रगति झाली आहे याचे शिक्षण द्यावे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यास व्यापार व उद्योगधंदे यांचे सामान्य शिक्षण देणान्या शाळा असाव्यात व यांत पुढील पिढीचे होतकरू व्यापारी व कारखानदार यांना निर्माण करण्यांत यावे.

देशहिताच्या दृष्टीने प्रत्येक चांगल्या व्यापाऱ्याने व उद्योगधंदा चालविणाराने चांगली मुले पाहून आपल्या जवळ उमेदवार म्हणून ठेवावी.. व्यवहाराचे साधारण काम या मुलांकडून करवून घेऊन त्यांना आपली विद्या शिकवावी. आपली गुप्त गोष्ट योग्य स्वदेशी माणसांना सांगण्यांत त्यांनी केव्हांहि आळस करूं नये; इतकेच नव्हे तर योग्य मुले शोधून काढून त्यांना आपले सर्व ज्ञान शिकवावें. आपली विद्या आपल्या देशात कायम रहावी, शक्य तर ती वाढावी इकडे प्रत्येक चांगल्या माणसाने लक्ष दिले पाहिजे. आपले रहस्य कोणाला सांगावयाचें नाहीं या दुराग्रहाने आपल्याकडील पुष्कळ कलांचा नांवापलीकडे मागमूस नाहीसा झाला आहे, या मागील अनुभवाने शहाणे होऊन आपण पुढे तरी ही चूक करूं नये, शिकणाऱ्या मुलांत योग्य बुद्धि व उत्साह पाहिजे ही गोष्ट खरी; पण आपण तपासच करूं लागलो तर योग्य बुद्धीची व कर्तबगारीची मुले आपणांस पाहिजेत त्याहून जास्त मिळतील. निदान कमी पडणार नाहीत. असा भरवसा वाटण्यास पुष्कळ जागा आहे. व्यापार वगैरेंची जास्त वाढ व्हावी म्हणून गरीब व मध्यम वर्गाची प्रवासाची जास्त सोय केली पाहिजे. यासाठी तिसऱ्या वर्गाचे भाडे कमी करून डबे अधिक सोईस्कर व जास्त केले पाहिजेत. डब्यांत पहिली सोय