पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वे.] व्यापार, उदीम यांत सुधारणा मंडळाचे मुख्य ध्येय पाहिजे. एका सालांत असे किती प्रयत्न यशस्वी झाले ही या मंडळाच्या कामाची कसोटी असावी व मंडळाने आपल्या कामाचा अहवाल दर सहामाहीस प्रसिद्ध करावा. ज्या ज्या कामांत परदेशी लोकांची स्पर्धा असते अशा प्रत्येक देशहिताच्या बाबींत स्वदेशी लोकांची एकी व योग्य प्रकारे सुरुवात यांचीच मोठी अडचण पडते. या नियमाला व्यापारधंदा काही अपवाद नाही. हे ओळखून आपणाला व्यापाराची नीट सुरुवात करून दिली पाहिजे. यासाठी येती दहा वीस वर्षे हिंदी व्यापार वाढीस लागण्यास योग्य अशी परिस्थिति कायद्याने करून दिली पाहिजे व एकदा आपला व्यापाराचा जम बसला म्हणजे मग मोकळा व्यापार व उघड स्पर्धा वगैरे बाबीच्या गोष्टी करता येतील, सरकारची मदत किंवा संरक्षक जकाती याशिवाय व्यापार वाढवा म्हणून उपदेश करणे किंवा परदेशी मालाची भयंकर चढाओढ असतां नवे कारखाने काढण्यास सांगणे म्हणजे लोकांना या गोष्टी करावयाला वावच न देणे होय. लहान मुलाला चालावयाला शिकावयाला जसा पांगुळगाडा किंवा मोठ्या माणसाच्या बोटाचा आधार लागतो त्याचप्रमाणे नवे कारखाने व व्यापार यांना संरक्षक जकाती व सरकाची मदत अवश्य असते. या गोष्टी न मिळाल्यास मूल जसे चालू लागणार नाही त्याच प्रमाणे व्यापाराचे होईल. यासाठी हिंदुस्थानचा व्यापार वाढण्यासाठी लागतील त्या सवलती हिंदुस्थानाला देण्यांत येतील असे सरकाराने वेळोवेळी जाहीर करावे, व इतर सुधारलेल्या देशांत या बाबतीत जे जे उपाय अमलात आणण्यांत आले होते व अजूनहि येतात ते सर्व उपाय ताबडतोब अमलांत आणावे. व्यापार वाढण्यासाठी सरकारी अधिकारी वगैरेंनी काढलेल्या सर्व हुकुमांना कायद्याचे स्वरूप असावे म्हणजे अधिकारी बदलले तरी त्यांची पिछेहाट होणार नाही. सवलतीचे धोरण एकदां जाहीर झाल्यावर कोणाहि अधिकाऱ्याने त्याला विरोध येईल असा कोणताहि हुकूम काढू नये व काढला तर त्यास मान्यता नसावी%B असा स्पष्ट कायदा व्हावयाला हवा. याप्रमाणे सर्व बाजूंनी देशी व्यापाराला उत्तेजन येईल अशी तजवीज कायद्यानेच केली पाहिजे व अशा तजविजीस सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केलीच पाहिजे असे निर्बंध हवेत,