पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण भावी हिंदी स्वराज्य [प्र० ९. गोळा करणारी मंडळे, खासगी संस्थांचे फिरते गुमास्ते व इतर व्यापारी लोक यांनी व्यापारोपयोगी माहिती या मासिकांत पाठवावी अगर स्वतःचे दरएक प्रांताचें निराळे मासिक असून त्यांत ती प्रसिद्ध करण्यांत यावी. माहिती वाढली तर हे मासिक साप्ताहिक किंवा दैनिक सुद्धा करण्यास हरकत नाही. जिल्ह्यानिहाय व्यापारी माहिती प्रसिद्ध करणारे एक नियतकालिक, व्यापारी संघामार्फत, प्रसिद्ध व्हावें. सरकारी व्यापारी खात्याने आपआपल्या प्रांतांतील भाषेत परदेशांत व्यापारासंबंधी काय नियम आहेत, कोणत्या पद्धति अंमलात असतात, इतर देशांत जकाती, रेलवे, बोटी वगैरेंचे काय भाव व नियम आहेत वगेरे माहिती सोप्या शब्दांत साधारण व्यापाऱ्याला समजेल अशा पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावी. सर्व हिंदुस्थानभर एक वजन, एक माप करण्याची खटपट व्हावी. 4प्रत्येक प्रांतांत त्या प्रातांतील व्यापाराची वाढ कशी होईल याचे चिंतन करण्यासाठी एक चेंबर ऑफ कॉमर्स पाहिजे व सर्व हिंदुस्थानासाठी अशा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थांची जूट पाहिजे, याशिवाय प्रत्येक शहरी एक व्यापारी संघ पाहिजे. या व्यापारी संघाचे एक माहितीपत्रक व शेती व कलाकौशल्याचे प्रदर्शन अगर संग्रहालय असावे, या संग्रहालयांत त्या जिल्ह्यांत होणाऱ्या वस्तु ठेवून त्यांच्या शेजारी परदेशांत होणाऱ्या तसल्या वस्तु मांडलेल्या असाव्या. अशा संस्था खाजगी असलेल्या उत्तम, पण कायद्याने त्यांना मंजुरी व सवलती दिलेल्या असाव्या. - प्रांतिक सरकाराने दर सहामाहीस पांच सहा चांगले व्यापारी परदेशी फिरतीवर पाठवावे, यांनी परदेशांतील व्यापाराचा अभ्यास करावा व आपला व्यापार तेथे वाढवावा. प्रांतिक व्यापारी मंडळाचे मुख्य काम म्हणजे त्या प्रांतांत समाईक भांडवलाचे मोठमोठे कारखाने काढण्यास उत्तेजन देणे व लहान लहान. कारखाने स्थापून कारखाने काढण्याचे लोकांस शिक्षण देणे हे होय. कर्तबगारीची, कल्पक व उत्साही माणसे मिळतील त्यांस योग्य उत्तेजन व जरूर ती मदत देऊन त्यांस कारखाना काढण्यास प्रोत्साहन देणे हे प्रांतिक