पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.] व्यापार, उदीम यांत सुधारणा हिंदी लोकांनी चालविलेल्या पन्नास लाखांवर भांडवल असलेल्या बँका दरएक प्रांतांत एक एक, दोन दोन तरी पाहिजे आहेत. योग्य माणसांनी मनावर घेतले तर या बँकांना पैसे व व्यवहार सहज मिळेल, सरकारी बँका, हुंडणावळीच्या बँका, खाजगी बँका, धंद्यांच्या बँका, शेतीच्या बँका वगैरेंचा परस्पर मेळ असावा. तात्पर्य, बँकांचे एक जाळेच देशभर विणलेले असावें. प्रत्येक तालुक्यांत एक तरी बँक आफीस पाहिजे, फुकट तपासणी, व्याजाची हमी, सरकारी मदत व सल्ला व दुसरें कांही लागेल ते देण्याचे अश्वासन देऊन प्रत्येक जिल्ह्यांत एक एक बँक स्थापविली पाहिजे, बँका या व्यापाराच्या माता आहेत, त्या व्यापार उत्पन्न करतात व वाढवितात, शेतकऱ्यांशी अडतीचा व्यापार करणाऱ्या बँकांची तर हिंदुस्थानांत अत्यंत जरूर आहे. धंदे व कारखाने यांना मदत करणाऱ्या बँका पाहिजे आहेत, पुष्कळ कल्पकांना पैसे नाहीत व पैसेवाल्यांना कोणाला मदत करावी हे समजत नाही. यामुळे दोघांचीहि हल्ली कुचंबणा होत आहे. या धंद्यांच्या पेढ्यांना त्यांच्या भांडवलाच्या दसपटीपर्यंत हुंड्या देण्याचा अधिकार असावा. जपानांत असा अधिकार दिलेला आहे व त्याचा फार उपयोग होतो. जिल्ह्यांतील लोकलबोर्ड व म्युनिसिपालिट्या यांचे पैसे जिल्ह्याच्या बँकेत ठेवावेत. या बोर्डीना कारखाने वगैरे काढण्यास पैसे या बँकांनी द्यावे. त्या कारखान्यांत योग्य ती सल्ला, देखरेख वगैरे करून त्यांना ऊर्जित दशेस आणावे. बँकांच्या शाखा दरएक मोठ्या गांवीं असाव्या. शेतकऱ्यांच्या पतपेढ्या वगैरे संस्थांना मदत करण्यासाठी शेतीच्या बँका पाहिजेत म्हणून वर सांगितलेच. जर या बँकांत परस्पर स्नेहसंबंध ठेवले, सरकारने त्यांवर योग्य नजर ठेवली, त्यांना व्यापार धंदे वगैरे वाढविण्यास सवलती दिल्या तर वर सांगितल्याप्रमाणे बँकांचे जाळे अत्यंत हितकर होईल व हा एक कायमचा फायदा देशाला मिळेल. हिंदी व्यापाराची कुचंबणा परदेशी आगगाड्या व आगबोटी यांनी फार होते. या बाबीचा विचार दळणवळणांची साधनें या सदरांत केला आहे, हिंदुस्थानांतील व्यापाराचा प्रवाह परदेशी व्यापारावर फार अवलंबून आहे. हिंदुस्थानचा अंतर्गत व्यापार म्हणजे कच्चा माल बाहेर ढकलणे व पक्का माल आंत जिरविणे इतकाच आहे, पण देशी घदे सुरू झाले भा...हिं...स्व...१०