पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] व्यापार, उदीम यांत सुधारणा १४३ सोन्याचे नाणे कायदेशीर व व्यवहार्य केल्याने या दोन्ही अडचणी एकदम मोडतील. जर योग्य वजनाचे व योग्य किंमतीचे सोन्याचे नाणे सुरू केलें तर हुंडणावळीची काळजी नको. ती आपणच स्थिर होईल. इतर देशांत सोन्याची नाणी आहेत व त्यामुळे बाजारभावाप्रमाणे जी हुंडणावळ असेल ती असेल, अशी स्थिति असते, तीच हिंदुस्थानाची असावी. कायदेशीर सोन्याचे नाणे म्हणजे सर्वत्र सोन्याची नाणी वापरली पाहिजेत असें कांहीं नाही, कानडा, संयुक्त संस्थाने वगैरे देशांत सोन्याचे नाणे चालू आहे. पण सोन्याचा डालर कोणी देत घेत नसतो. सोन्याच्या नाण्याच्या भावाने नोटा व हुंड्या चालतात. हिंदुस्थानासारख्या देशांत जेथे परदेशांतूनच पुष्कळ पैसे येणे असतात, व लोकांजवळ असलेला पुष्कळ सुवर्णसंग्रह सरकारला उपयोगी पडेल तेथे सोन्याचे नाणे करण्यास अडचण आहे असे मुळीच नाही. सरकारची एक मध्यवर्ती पेढी व प्रांतोप्रांती सरकारी शिल्लक बाळगणाच्या पेट्या असल्या म्हणजे कागदी नोटांसाठी लागणारे सोने या पेढ्यांत सहज सांठविता येईल व त्याच्या जोरावर कागदी नाणे खुशाल सर्वत्र चालेल. असे केले म्हणजे नाण्याची गंगाजळी ठेव जी ३१ मार्च १९१९ रोजी नऊ कोट पाउंड होती ती लंडनमधून आपोआप हिंदुस्थानांत येईल. ही ठेव हिंदुस्थानांत आली की, हिंदुस्थानची पत आपोआप वाढेल व तिचा उपयोग व्यापाराच्या वाढीत पुष्कळ होईल. तसेंच हल्ली सरकारला लागणारी चांदी लंडनमध्ये खरेदी करण्यांत येते ती हिंदुस्थानांत खरेदी करता येईल. सोन्याचे नाणे झाले म्हणजे रुपयाची किंमत कृत्रिम न ठेवतां ती इतर खुर्याप्रमाणे वाटेल ती असू शकेल. हिंदुस्थानांतील प्रांतिक बँका मोडून सगळ्या हिंदुस्थानची एक इंपीरिअल बँक करण्यांत आली आहे. पण ही एक मोठी चूकच आहे. प्रत्येक प्रांतीय बँकेला त्या त्या प्रांतांत खुशाल काम करू द्यावे, ज्यांना बँका नाहीत त्यांना नव्या प्रांतिक बँका स्थापू द्याव्या व याप्रमाणे एकमेकांत चढाओढ राहू द्यावी. एक बँक केल्याने चढाओढ़ व चोख व्यवहार कमी होतो; पण पत कांही वाढत नाही. यामुळे व्यापाराला उत्तेजन न मिळतां सुस्ती मात्र येते. हिंदुस्थानासारख्या अवाढव्य देशांत फ्रान्स, जर्मनी,