पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ भावी हिंदी स्वराज्य [प्र०९ घातक आहे. काही आकस्मिक कारणाने त्या देशाला इतका व्यापार करणे अशक्य झाले तर दुसरी काही व्यवस्था होईपर्यंत हिंदुस्थानचे हाल कुत्रा खाणार नाही. गलबते बांधण्याचे व चालविण्याचें हिंदी कसब पार लयास बोलें आहे. महायुद्धांत विलायती जहाजांना फुरसत नसल्यामुळे हिंदुस्थानच्या व्यापाराचे कार हाल झाले... व्यापाराची उलाढाल करणाऱ्या सर्व बँका हिंदुस्थानांत परकीय आहेत. देशांतील अंतर्गत भागांत पोटबँका व त्याच्या गांवोगांव शाखा यांची मोठी उणीव असून तिच्या पूर्णतेसाठी कांहींच तजवीज केलेली नाही. शेतकऱ्यांचा फायदा होईल अशा त-हेने अडते वगैरेंची सोय नसल्याने परदेशी जाणाऱ्या मालावर दलालच गबर होतात. शेतक-याला त्याच्या मालाची भरपूर किंमत मिळावी म्हणून कानडा देशाप्रमाणे हिंदी सरकारने मदत देण्यासाठी काहींच योजना केलेली नाही. सरकारी रिपोर्टोत व्यापाराचा उगीच भपकेदार सारांश दिलेला असतो. पण त्यांत परकी लोकांनी चालविलेला व्यापार किती व हिंदी लोकानी चालविलेला किती अशी फोड नसते. अशी फोड केली तर तत्काळ हा भ्रमाचा भोपळा उघडा पडेल. - पुष्कळ दिवसांपासून लोकांची खात्री झाली आहे की, हिंदी लोकांच्या हाती राज्यकारभार आल्यावांचून त्यांना पाहिजेत त्या व्यापारी सोई व्हावयाच्या नाहीत. जर खरें देशहित व्हावे असे वाटत असेल तर उद्योगधंद्याची बाब पूर्णपणे हिंदी लोकांच्या हाती आली पाहिजे. हल्लींची नाण्याची पद्धति, जीत विलायती सावरिन व हिंदी रुपया ही दोन्ही नाणी वाटेल त्या रकमेपर्यंत कायदेशीर नाणी आहेत ही पद्धत, गैर आहे. कोणतें तरी एक नाणे कायम व प्रमुख पाहिजे. यामुळे भावाचा नेहमी घोटाळा होतो, तो एक नाण्याने मोडेल. हे एक नाणे सोन्याचेच असावें, नाण्याच्या भावांत एकदम चलबिचल होऊन हिंदी व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी तजवीज झाली पाहिजे, हल्लीच्या पद्धतीने महायुद्धांत व एरवीं ग्रुष्कळ त्रास दिला आहे व शिवाय तींत खालील दोष आहेत:--- १ निरर्थक महागरें असें चांदी नाणे पाडावे व सांठवावे लागते. २ दहावीस वर्षांत कधीतरी जिचा एक दिवस उपयोग होईल अशी गंगाजळी ठेव विलायतेंत हमेश ठेवावी लागते.