पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यापार, उदीम यांत सुधारणा देशाचे नांव लोकसंख्या उलाढाल शेरा बेल्जम ७५,००,००० ३२,६०,००,०००१९१३ त. कानडा ७२,००,००० ५०,९०,००,००० १९१८ त. हिंदुस्थान ३१,५०,००,००० २८,२०,००,००० १९१८ त. महायुद्धांत कानडाचा परदेशचा व्यापार शेकडा २३१ वाढला व जपानचा २३२ वाढला, पण हिंदुस्थानचा मुळीच वाढला नाही. सरकारी रिपोर्टीत फक्त या सालांत कानडा हिंदुस्थानला मागे टाकून गेला इतकाच उल्लेख केला आहे. दोन्ही देश ब्रिटिश साम्राज्यांत असून एकाची लोकसंख्या ऐंशी लाख व दुसऱ्याची साडेएकतीस कोटी असतांना लहानसा देश मोठ्या देशाला मागे टाकतो याबद्दल रिपोर्ट लिहिणाराला काहीच वाटलेले दिसत नाही. याचा अर्थ इतकाच की, महायुद्ध चालू असतां कानडाने आपले व्यापार व धंदे वाढविले; पण हिंदुस्थानाने तसे केले नाही. महायुद्ध संपतांच सर्व सुधारलेल्या राष्ट्रांनी व्यापार वाढविण्यास कंबरा बांधल्या आहेत. शस्त्राच्या युद्धानंतर व्यापारी चढाओढ म्हणून सर्व राष्ट्रांत हुरूप आला आहे. अशा वेळी जर हिंदुस्थान स्वस्थ राहिला तर हा मोठा आत्मघातकीपणा होणार आहे. यांत जगांतील चढाओढीत हिंदुस्थान मागे राहील; इतकेच नव्हे तर यावेळी जर हिंदुस्थानांतील उद्योगधंदे वाढले नाहीत तर परदेशी व्यापाऱ्यांच्या कचाटींत हिंदुस्थान कायमचे डांबले जाईल. शेती व धंदे या दोहीतहि, विशेषतः धंद्यांत, या वेळी वाढं झाली पाहिजे, म्हणजे स्वदेशांत व परदेशांत आपला व्यापार वाढेल. मुंबई शहराबाहेरील हिंदुस्थानचा सगळा परदेशी व्यापार इंग्रजांच्या हाती आहे व हिंदी लोकांच्या हाती त्यापैकी फारच थोडा भाग आहे. 1 हिंदुस्थानांतून परदेशी जाणारा माल म्हणजे धान्ये व कच्चा माल होय. इतर देशांतून बहुतेक पक्का मालच बाहेर जाऊ देतात, तसेच हिंदुस्थानांत आयात होणारा माल म्हणजे पक्का माल होय व त्यापैकी निम्मा अधिक माल विलायतेतून येतो. हिंदुस्थानचा व्यापार मुख्यत्वे विलायतशी आहे. आयात व्यापाराचा शेकडा चौपन्न व एकंदर उलाढालीचा शेकडा सव्वीस भाग विलायतशी चालतो. ही पद्धत अशीच चालण्यास हरकत नाही असे गृहात धरले तरी अशा रीतीने केवळ एकाच देशावर अवलंबून असणे मोठे