पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या प्रकरण नववेंकी । व्यापार, उदीम यांत सुधारणा . हिंदुस्थानच्या व्यापारांत काय सुधारणा पाहिजेत हे नीट समजण्यासाठी 'हिंदुस्थानच्या व्यापाराचे थोडेसे आंकडे पाहिले पाहिजेत. यासाठी हिंदुस्थानच्या आयात व निर्गत व्यापाराचे ठळक आंकडे सन १९१९ या एका वर्षाचे सोबतच्या तक्त्यांत दिले आहेत, याच्या मागच्या सहा वर्षीचा आढावा पाहिला तर आयात व्यापार १०६,०००,००० व निर्गत व्यापार १५५,०००,००० चलनी पौडांचा असून एकंदर पर. देशचा व्यापार २६१,०००,००० पौडांचा होता. यांत महायुद्धानंतर आयात मालाची किंमत शेकडा १११ नी वाढली आहे व निर्गत मालाची किंमत फक्त शेकडा २५ च वाढली आहे, ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे जरी आयात व्यापार वाढलेला दिसतो तरी प्रत्यक्ष माल हिंदुस्थानांत दिवसेंदिवस कमीच येत आहे असे दिसेल, व त्याचप्रमाणे एकूण व्यागार कमीच होत आहे हे उघड होईल, याबाबद हिंदुस्थान व जगांतील इतर देश यांची तुलना खाली दिली आहे. देशाचे नांव माणशी व्यापार १९१३-१४ माणशी व्यापार १९१८-१९ विलायत ३० कानडा २.९ संयुक्त संस्थाने ८.८ १८.४ जपान २१.३ हिंदुस्थान ०.८ हैं तुलनात्मक कोष्टक पाहतांना हे लक्षात ठेवले पाहिजे की, जिनसांचे भाव जगांत सगळ्या देशांत वाढले आहेत. लोकसंख्येच्या मानाने व्यापाराचे आंकडे बसतात ते खाली दिले आहेत. ७