पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्योगधंद्याची तयारी १३७ ठेवली पाहिजे. हिंदुस्थान सरकारने या कामांत पडण्याचेच कारण नाही. हिंदी लोकांच्या सल्लागार मंडळाच्या देखरेखीखाली प्रांतिक सरकारने हे काम हाती घेतले म्हणजे पुरे. प्रांतिक सरकारला मुबलक पैसा पुरविणे व त्याच्या कामांत ढवळाढवळ न करणे इतके धोरण हिंदुस्थान सरकार व स्टेट सेक्रेटरी यांनी ठेवले म्हणजे पुरे. परदेशीय प्रतिस्पध्यांपासून, खुद्द इंग्लंडच्या कारखान्यापासून या बाल कारखान्यांचे संरक्षण करण्याचे काम मात्र यांनी केले पाहिजे. या कामांत त्यांचा आळस अगर हेळसांड अगदी अक्षम्य होईल, मग लोकांचा देशाभिमान व स्वार्थपरायणता ही बाकी सर्व कासे करूं शकतील, आपला देश व त्याबरोबर मी संपन्न व्हावें ही इच्छा प्रत्येक माणसाच्या हृदयांत असतेच व त्या इच्छेच्या जोरावर तो जितकें काम करील तितकें या कार्याला पुरे आहे, ___अधिकारी किंवा नोकरशाही व जनता यांत इतके वांकडे असते की, ही दोन्ही संतुष्ट व संपन्न असणे शक्य नाही. एक जनता तरी संतुष्ट व संपन्न होईल किंवा नोकरशाही तरी संतुष्ट व संपन्न होईल, कदाचित दोघेहि भिकारी होऊन मरतील पण दोघेहि संतुष्ट व संपन्न होणे शक्य नाही. यासाठी नोकरशाहीवर बिलकुल न विसंबतां लोकांनी या कामी कंबरा बांधल्या पाहिजेत. आळस टाकून आपण स्वतः हे काम करून दाखविणार या ईर्षेने प्रत्येकाने कामास लागले पाहिजे. कौन्सिलच्या सभासदांनी एकजुटीने या कामी प्रयत्न व नियम केले पाहिजेत. विद्वानांनी आपली विद्वत्ता जरूर ती माहिती गोळा करण्यांत खचून तिचा सर्वत्र प्रसार केला पाहिजे, होतकरू तरुणांनी प्रयोगशाळांत व कर्मशाळांत काम करण्यांत आयुष्य घालविले पाहिजे. धनिकांनी पैसे पुरविण्यास तयार होऊन कारखान्यांच्या कामावर देखरेख करण्यास पुढे सरसावले पाहिजे. व्यापाऱ्यांनी आम्ही हाच माल विकू असे ठरविले पाहिजे. मजुरांनी तुम्ही शिकवाल तें शिकन या कारखान्यांत काम करण्यास तयार आहो असे दाखविले पाहिजे. पोरांनी या कारखान्यांतील जिनसा घरोघर नेऊन विकण्यास पुढे आले पाहिजे, गिहाईकांनी आम्ही या देशी कारखान्यांचाच माल खरेदी करूं, नाही तर उपाशी राहूं किंवा या मालाशिवायच चालवू असे ठरविले पाहिजे. याप्रमाणे सर्व भेदभाव विसरून एक दिलाने करण्यायोग्य हे काम आहे व त्याच्या