पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ भावी हिंदी स्वराज्य [प्र०८ योग्यतेप्रमाणे आपण त्याची संभावना केली पाहिजे, इतकी आपण तयारी केल्यावर दयाघन परमेश्वर लांब नाहीं. याप्रमाणे प्रत्येक जीवापासून परमात्म्यापर्यंत सर्वजणांनी मनावर घेतल्यावर हे काम फत्ते झालेच पाहिजे. नोकरशाहीचा या कामीं कांहीं विरोध होईल. पण आपल्या हिंदी लोकांच्या एकजुटीपुढे हा विरोध टिकणार नाहीं याप्रमाणे उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सल्लागारमंडळे, पेढ्या, कंपन्या, प्रयोगशाळा, संग्रहालये, अडत्ये, माहिती देणारी मंडळी, धंदेशिक्षणाच्या शाळा, धंदे व त्यास लागणारे सामान यांची खानेसुमारी, कारखाने, दुकानदार व गि-हाईक इतक्या मंडळ्या स्थापून ही कामे करण्यास आपण लोकर सुरुवात केली पाहिजे, 'शुभस्य शीघ्र '.