पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] उद्योगवंद्याची तयारी मंडळ, प्रयोगशाळा वगैरे धंद्यांसंबंधाच्या सर्व संस्थांशी संबंध असावा व या मंडळाचा सल्ला सर्व उद्योगधंद्यांच्या चालकांनी घ्यावा व कोणालाहि लागेल ती माहिती या मंडळाने पुरवावी. मा. प्रत्येक प्रांतांत एक तरी धंदेशिक्षणाचे कालेज व जिल्ह्यांत धंदेशिक्षणाची एक तरी शाळा पाहिजे. या ठिकाणी विज्ञानशास्त्र व रसायनशास्त्र यांचा उद्योगधंद्यांत उपयोगी पडणारा भाग शिकविला पाहिजे. या शाळांना जोडून प्रयोगशाळा व कर्मशाळा जोडाव्या व खेडेगांवांतील सर्व शाळांतून यंत्र, त्यांची रचना व दुरुस्ती हा विषय शिकवावा. अशा प्रकारच्या शाळा जर पांचपन्नास वर्षापूर्वीच काढण्यांत आल्या असत्या तर हिंदी लोकांची साधनसंपत्ति व कौशल्य यांचा विचार करतां हिंदुस्थान आज जपानच्या पुढे असता. प्रत्येक जिल्ह्यांत कोणते धंदे करण्याची किती साधने आहेत यांची नक्की माहिती गोळा करून ती लोकांना प्रसिद्ध करून कळवावी, या पत्रकांत इतर देशांत याबाबद जी माहिती प्रसिद्ध करण्यांत येते ती सर्व प्रसिद्ध करावी व शिवाय प्रत्येक धंद्यांत कोणत्या जातीचे किती लोक गुंतले असून त्यांना किती उत्पन्न होते ही माहिती द्यावी. खानेसुमारीच्या वेळी ही माहिती गोळा केल्यास पुष्कळ खर्च वाचेल. सरकार व उद्योगधंद्यांच्या संस्था यांनी परदेशांत त्या त्या धंद्यांत काय सुधारणा झाल्या आहेत याबाबद माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करावी. जमाबंदी खात्याच्या वार्षिक अहवालांत तालुका, शहर व जिल्ह्या यांतील उद्योगधंद्याची माहिती द्यावी. उद्योगधंद्यांची प्रगति झाली तर हिंदुस्थानचे उत्पन्न पुष्कळ वाढेल यांत संशय नाही. भांडवल, निश्चय, लोकांचा सर्वस्वी स्वतंत्र ताबा, सर्व प्रकारची वर सांगितल्याप्रमाणे सरकारची मदत या गोष्टी असल्यावर हिंदुस्थानांत जो कच्चा माल मिळतो त्याचे पक्के जिन्नस करण्याचे सर्व कारखाने काढतां येतील. आज काढतां येतील. आज म्हणण्याचे कारण की आजची परिस्थिति या कामाला फार योग्य आहे. महायुद्धामुळे जगांतील सर्व राष्ट्र हैराण आहेत, जर्मनी व फ्रान्स भांडणांत गुंतले आहेत व त्यामुळे उद्योगधंद्याची चढाओढ कमी व जिनसांचे भाव बरे आहेत. अशी संधी फिरून येणार नाही. सर्व