पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० सल्लागार मंडळाने दरमहा आपल्या प्रांतांत कोणत्या कंपन्या निघाल्या व त्यांची स्थिति काय आहे याची माहिती प्रसिद्ध करावी, व ही माहिती जिल्हा व तालुका कमेटीच्या कचेऱ्यांत ठेवावी म्हणजे ज्याला वाटेल त्याला त्या कंपन्यावर देखरेख व कंपन्यांना सल्ला देता येईल. उद्योगधंद्यासाठी नवीन शोध लावणाऱ्या, लागलेल्या शोधांची छाननी करून त्यांस व्यवस्थित स्वरूप देणाऱ्या मंडळ्या प्रांतानिहाय असाव्या. या मंडळ्यांचा युनिव्हर्सिटी व रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याशी एकजीव असावा. एकमेकींनी एकमेकींस शक्य ती मदत करावी. जुटीने कामें करावी व सर्वांचा अनुभव सर्वाना उपयोगी पडावा. तात्पर्य, हे काम माझें आहे व देशहिताचे आहे ही जाणीव ठेवून प्रत्येकाने दुसऱ्यास मदत करण्यास तत्पर असले पाहिजे.. 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना' हे वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे आहे. 'नहि सर्वविदस्तु सर्वे' परमेश्वर कोणाला कांहीं, कोणाला काही जास्त देत असतो व या जास्ती दिलेल्याचा फायदा त्याने सास दिला तर सर्वांना सर्व दिल्याप्रमाणे होते. , त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांचे प्रयोग करून पाहण्याचे कारखाने दरएक जिल्ह्यास एक तरी पाहिजेत. हे कारखाने सरकारने काढावे व उद्योगधंदामंडळाची त्यावर देखरेख असावी. त्यांचे मुख्य उद्देश म्हणजे लोकांत प्रयोग करून पाहण्याची गोडी उत्पन्न करावयाची, कोणी प्रयोग करीत असेल तर त्यास सल्ला व प्रोत्साहन द्यावयाचे, यशस्वी प्रयोगवाल्याला धंदेवाला दाखवून द्यावयाचा अगर त्याची भांडवल मिळण्यासाठी शिफारस करावयाची हे होत. अशा संस्थांची हिंदुस्थानांत अत्यंत उणीव आहे. पुष्कळ कल्पक अशा संस्था, शिफारस नसल्याने, भांडवलाला महाग झाल्या आहेत व पुष्कळ भांडवलवाल्यांना कशांत भांडवल घालावे ते समजत नाही. अशा स्थितीत या सरकारी संस्था फार उपयोगी होतील, हिंदुस्थानांत सर्व काही आहे पण त्यांचा एकमेकाशी मेळ नाही व हा मेळ घालण्याचेच पहिले मुख्य काम आहे, .. त्याचग्रमाणे उद्योगधंद्यांची पदार्थसंग्रहालये दरएक जिल्ह्यास एक याप्रमाणे पाहिजेत. तसेच उद्योगधंद्याबद्दल चौकशी करणारे व माहिती पुरविणारे एक मंडळ हवे, या मंडळाचा रिसर्च इन्स्टिट्यूट, ..सल्लागार