पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्योगधंद्याची तयारी - याप्रमाणे सरकार व जनता यांच्या एकोप्याने मनापासून जर उद्योगधंद्यांची अभिवृद्धि होण्यासाठी प्रयत्न झाले तर लोकांचे जे पैसे हल्लीदागदागिने वगैरेंत पेट्यांत आहेत ते पेढ्यांत येण्यास वेळ लागणार नाही. हे दागिने म्हणजे अडचणीसाठी ठेवलेली ठेवच आहे व ती घरांत ठेवण्यापेक्षा पेढ्यांत ठेवणेच सोईचे व सुरक्षित होय, तसेच आपल्या अर्थशास्त्राप्रमाणे तीस वर्षांना पुरेल इतक्यापेक्षां ज्यास्त असलेला संग्रह राष्ट्रकार्यात (धर्मकृयांत) वापरावा असा नियम आहे. याप्रमाणे गांवोगांव पेढ्या निघून धंद्यांसाठी भांडवलाचा तोटा अगर अडचण पडणार नाही. याशिवाय पुढाऱ्यांनी घरोघर जाऊन, लोकांना नफा तोटा समजावून देऊन, त्यांच्या शंका निवारण करून व आपल्या उदाहरणाने त्यांना तसे करण्यास उत्तेजन द्यावे. पेढ्यांच्या व्यवस्थापकांनी लोकांच्या सर्व सोई होतील अशा सवलतीने वागले पाहिजे. पेढ्यांवर कांहीं दागिन्यांचे गट ठेवून लग्नकार्यात जरूर ती हमी देणारास वापरण्यास देण्याची व्यवस्था केली तर हौशीत कमतरता पडणार नाही. शिवाय कालांतराने दागिन्यापेक्षां बँकबुक पाहण्याकडे लोकांची प्रवृत्ति होईल ते निराळेंच, तात्पर्य, खरी कळकळ याबाबद उत्पन्न झाली पाहिजे व होईल, उद्योगधंद्यासाठी समाईक भांडवलाच्या कंपन्या निघण्यास उत्तेजन यावे म्हणून कंपन्यांच्या कायद्यांत जपान वगैरे देशांच्या नमुन्यावर योग्य त्या सुधारणा झाल्या पाहिजेत. या कायद्यांत प्रांतांच्या स्थानिक स्थितीला अनुसरून योग्य ते फेरफार करण्यास प्रांतिक सरकारांना मुभा असावी. कंपनी कशी स्थापावी, तिचे काम कसे चालते याबाबद शाळांतून शिक्षण ध्यावे व लोकांना व्याख्यानाने शिकवावे. हे शिकविण्याचे काम नुसत्या कंपन्या स्थापण्याची इच्छा करणाऱ्यांकडे सोपवू नये; कारण त्यांच्या बोलण्याकडे लोक वकील या दृष्टीने पाहतात. यासाठी हे काम उपदेशकांनी पत्करले पाहिजे, प्रांतानिहाय उद्योगधंद्याचे सल्लागार मंडळ नेमून त्यांच्याकडे हे काम द्यावे. या मंडळाच्या जिल्ह्यानिहाय व तालुक्यानिहाय शाखा स्थापाव्या व त्यांनी हे उपदेशाचे काम करावें. जर्मनींत पेढीवाला आपल्या ठेवी ठेवणाराला अमुक कंपनीत हा पैसा घातला तर जास्त फायदा होईल असा सल्ला देतो. ही पद्धत जरूर तर वापरून पहावी. प्रांतिक