पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०८ तेव्हां करता येईल व मग दहा पांच वर्षांत कसबी मजूर वाटेल तेवढे मिळतील. भांडवल असेल तर उत्तम यंत्रे विकत आणतां येतील. प्रारंभी ही यंत्रे विकतच घेतली पाहिजेत, पुढे यंत्रे हिंदुस्थानांत तयार होतील. जर भांडवलाचा योग्य उपयोग देशांत होऊन त्यापासून देशाचा व भांडवलवाल्यांचा नफा होईल तर लागेल तितके भांडवल मिळेल, हिंदुस्थानाला परदेशांतून भांडवल आणण्याची जरूर पडेल असे वाटत नाही. परंतु जर पडलीच तर योग्य धंद्यांसाठी परदेशी भांडवल उसने घेण्यास हरकत नाही. तज्ञ मात्र पृथ्वीच्या पाठीवर जेथे मिळतील तेथून त्यांस योग्य वेतन देऊन आणले पाहिजेत. त्यांचे वेतन महिना पगार व नफ्याचा हिस्सा असे ठरवावे, कांहीं धंदे इंग्रज किंवा दुसरे परकी व्यापारी यांच्याशी भागीने सुरू करण्यांत फायदा होईल. कारखाना चालविणारे व डायरेक्टर यांची हिंदुस्थानांत वाण नाही. मात्र त्यांना तज्ञांची मदत आणि भांडवलाचा पुरवठा झाला पाहिजे. जपानांत सुद्धा या कामी पूर्वीच्या पद्धतीचे जुने वाकबगार यांच्या हाती सूत्रे असन प्रत्यक्ष कामें करण्याचे काम तरुण होतकरू आधुनिक सुशिक्षितांच्या हाती आहे व तीच पद्धत आपण घेतली पाहिजे. उद्योगधंद्यांची भरभराट करावयाची असें सरकारचे एकदां धोरण ठरलें म्हणजे हिंदुस्थानांत बनिक व उद्योगी माणसें पुढे येऊन त्या धोरणाचा फायदा घेण्यास तयार अशी पुष्कळ मिळतील, जपानप्रमाणे सुशिक्षित माणसें परदेशी पाठवून तयार करून आणण्याचे काम सरकारने केले पाहिजे. उद्योगधंद्याच्या वृद्धीचे काम जर यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर नेमलेले अधिकारी हंगामी असावेत व त्यांस वेतन नफ्याच्या प्रमाणांत असावें. यामुळे थोडा जास्त खर्च येईल पण हिंदी लोकांचे शिक्षण व कामांतील यश याबद्दल खात्री राहील. धंद्यांना लागणारे भांडवल कसे उभारावें याचा उहापोह आर्थिक बाबीत केला आहेच, पण येथे इतकेच सांगावयाचे की, लोकांनी आपली सर्व संपत्ति पेढ्यांत ठेवली पाहिजे व त्या पेढ्यांनी लहान कारखानदारांस रोख कर्ज द्यावें व मोठे कारखाने समाईक भांडवलाच्या पद्धतीने चालवावे. माग