पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्योगधंद्याची तयारी १३१ (७) उद्योगधंद्यांची खानेसुमारी दर तीन वर्षीस घेणे व त्यांत कोणत्या धंद्यांत किती भांडवल, काय नफा वगैरे माहिती प्रसिद्ध करणे. ... या पत्रकांत सरकाराने दिलेल्या सवलतींचा उल्लेख असावा. सर्व S, सुधारलेल्या देशांत योग्य प्रकारच्या आयात निर्गतीवर जकाती . ठेवून कारखानदारांना उत्तम मदत करण्याची वहिवाट आहे.. प्रांतिक सरकारांनीहि वर सांगितलेल्या धोरणाने आपआपल्या प्रांतांत गलबतें बांधणे, यंत्रे करणे, इंजिने व मोटारी करणे, रासायनिक धंदे. कागद, कांच, आगकाड्या वगैरेंना सुरुवात करून अगर मदत देऊन उत्तेजन द्यावे. एखाद्या धंद्याला लागणारा अवश्य तेवढा भाग मात्र आपण करून द्यावा, कारखान्यांतील कित्येक रहस्ये नुसती पैसा खर्चुन आयती मिळत नसतात. ती प्रत्यक्ष प्रयोग करूनच संपादन करावी लागतात. धंदे ऊर्जित दशेला येण्यासाठी धंद्यांच्या बाबतीत विश्वास व कामाची एकसूत्री परंपरा निर्माण केली पाहिजे. पहिल्याने अमुक काम करावयाचे; ते इतके वाढले म्हणजे तमुक त्यास जोडावयाचे व याप्रमाणे पायरीपायरीने कारखाना वाढवावयाचा असा लांबपर्यंत घोरण ठेवून बेत करणे कारखान्यांत अवश्य असते. सोळा अश्वगतीचे एक यंत्र चालविण्यास आठ अश्वगतीच्या दोन यंत्रांपेक्षां पुष्कळ कमी खर्च लागतो म्हणून दूरवर नजर ठेवून जास्त काम वाढविण्याची तजवीज अगोदरपासून ठेवणे अधिक हितावह असते. या कामांची ज्यांना कळकळ आहे अशा पुढाऱ्यांच्या ताब्यांत कारखान्याची सर्व सूत्रे असावीत व त्यांच्या सल्ल्याप्रमाणे कामें चालावीत. यासाठी उद्यागधंदे-सहाय्यक अडव्हायजरी बोर्ड नेमावे व त्या बोर्डाच्या सल्ल्याप्रमाणे उद्योगधंद्याच्या संबंधांत आपण धोरण ठेवू असे सरकारने ठरवावें व प्रसिद्ध करावे म्हणजे त्या धोरणाने कारखानदार आपले कारखाने काढतील अगर वाढवितील. कारखाना चालविण्यास लागणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे चालनाचे सामर्थ्य, मजूर, तज्ञता व कुशलता, भांडवल, यंत्रे, कच्चा माल व कामें चालविण्याचे घोरण ही होत. कच्चा माल तर हिंदुस्थानांत. रग्गड मिळतो. येथे तो खपत नसल्याने, वापरण्यात येत नसल्याने, तो परदेशी जातो. मजुरांचा घुरवठा पुरेसा आहे. या मजुरांना शिकविण्याची सोय नाही. पण ती हवी