पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० भावी हिंदी स्वराज्य [प्र. असतांना ते सोडून त्यांना आवरून धरण्यासाठी अधिकारी नेमण्यांत अर्थ काय ? लोकांविषयीं सहृदयता, लोकांना मदत करण्याची उत्सुकता व लोकांच्या ताब्यांत मोकळेपणी कामे देण्याची तयारी या गोष्टी झाल्याशिवाय धंद्यांना ऊर्जित दशा येणार नाही. . रेलवेची व्यवस्थाहि देशी उद्योगधंद्यांच्या वाढीस पोषक नाही अशी तक्रार आहे. फैक्टरी इनस्पेक्टर येऊन प्रारंभीच मोठी यंत्रसामुग्री व घुष्कळ खर्चाच्या इमारती पाहिजेत असा हट्ट धरतात, व यामुळे कारखाने काढण्यास अडचणी येतात. परदेशांतून शिकून आलेल्या हिंदी लोकांना भांडवलाची मदत मिळत नाही व त्याच योग्यतेच्या इंग्रजापेक्षा कमी पगार मिळतो. या व असल्या दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी उद्योगधंदे पुढे सरसावत नाहीत. याबाबद चौकशी होऊन या सर्व अडचणी दूर केल्या पाहिजेत. अगदी एखाद्या ठिकाणी थोडा जरी जुलूम झाला तरी त्याचा परिणाम दहा कारखान्यांवर झाल्यावांचून रहात नाही. याच्या योगाने लोकांचा विश्वास जातो व कारखानदार नाउमेद होतात. खाली लिहिलेल्या रीतीने सरकारला कारखानदारांना मदत करता येईल. -मा (१) कोणताहि नवा कारखाना निघाला म्हणजे चढाओढी पासून त्याचा बचाव व्हावा म्हणून सहा वर्षे किंवा कारखाना नीट चालेपर्यंत त्यांत तयार होणाऱ्या मालासारख्या परदेशी मालावर - जकात ठेवणे. आ.(२) यंत्रे, रासायनिके, गलबते वगैरे धंदे परदेशी लोकांनी हिंदुस्थानांत 5 सुरू केल्यास त्यांसहि वरीलप्रमाणे संरक्षण देणे. (३) अगदी मोठे-आगगाड्या, आगबोटी वगैरेसारखे-कारखाने सरकारने स्वतः सुरू करून, चांगले चालू लागले म्हणजे लोकांच्या - स्वाधीन करणे. (४) लोकांनी काढलेल्या कारखान्यास सालोसाल मदत, किंवा व्याजाची हमी, किवा भांडवलाचा पुरवठा करणे. (५) तज्ञांची मदत कारखानदारांना फुकट देणे, परकी देशांतून त्याime साठी तज्ञ मागवून देणे. (६) मालाला रेलवेभाड्याची सवलत देणे.