पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्योगधंद्यांची तयारी म्हणजे केवळ हस्तकौशल्यापासून थोडी फार यंत्रशक्ति, इतक्या शक्तीचे काम असते. निजामा - पंधरा लाखांच्या वर ज्यांना भांडवल लागते व पन्नास हजारांच्या आत ज्यांचा सर्व कारभार, अशा या दोन टोकांच्या मध्ये असणारे सर्व धंदे साधारण धंदे होत. हे धंदे एकाच्या मालकीचे, भागीदारीचे किंवा समा. ईक भांडवलांचे असू शकतील. मोठ्या कारखान्यांत होणारा माल केव्हां केव्हां या लहान कारखान्यांत तयार होतो. मात्र अशा वेळी हा महाग असल्याने मोठ्या कारखान्यापासून लांबच्या भागांतल्या लोकांच्या गरजापुरता मात्र तो होतो. तर हिंदुस्थान सरकारने १९१६ साली असे धंदे सुरू करण्याची अनुकूलता पाहून त्यांची योजना तयार करण्यासाठी एक कमिशन नेमलें होतें. या कमिशनचा रिपोर्ट प्रसिद्ध होऊन काही वर्षे झाली. त्यांत फक्त घरगुती धंद्यांचाच विचार केला असून साधारण भांडवलांच्या धंद्यांचा थोडा विचार केला आहे. या कमिशनच्या सूचना उत्तम आहेत. पण त्यांनी मोठ्या धंद्यांचा प्रश्नच मुळी विचारांत घेतला नाही. या कमिशनची मोठी महत्त्वाची सूचना म्हणजे सरकारांनी मध्यवर्ती व प्रांतिक सरकारांनी आपआपल्या प्रांतापुरती धंद्यांची खाती काढावी. या खात्यांतून तज्ञ नोकर ठेवावे व यांनी या धंद्यांना उत्तेजन द्यावें, योजना करावी, मांडणी करून द्यावी ही होय. कन्याप्रमाणे परदेशी लोकांचे एक उद्योगधंद्याचे अधिकारीमंडळ मात्र नेमण्यांत येणार. नोकरशाहीचे सगळेच काम नोकरशाही ! लोकांच्या अंगांत शक्ति नाही तर लोकांना पौष्टिक अन्न खाऊन दाखविणारे एक अधिकारीमंडळ असावे व त्याने तूप, मध वगैरे खाऊन, जोर काढून दाखवावे असे हे सरकार ठरविणार ! त्याचप्रमाणे ही सगळीच योजना चुकीच्या धोरणावर रचलेली आहे. लोकांना खरोखर मदत व संरक्षण पाहिजे आहे. त्यांना ताब्यांत ठेवणे व आंवरून धरणे याची जरूर नाही. वरील उदाहरणांत लोकांना तप व मध मिळेल अशी तजवीज करण्याऐवजी आपण ते खाऊन दाखविण्याची जशी चुकीची रीत होती तशीच ही चुकीची रीत आहे. धंद्याच्या वाढीत अनेक प्रकारांनी धंदेवाइकांना मदत करण्यासारखी भा...हि...स्व...९