पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ भावी हिंदी स्वराज्य [प्र०१ परमेश्वरापर्यंत वाटेल त्या जागेवर आरूढ होतां येईल, अशी भावना या प्रजासत्तात्मक देशांत असते. आपल्याकडे या तिन्ही तत्वज्ञानाच्या पद्धति रूढ आहेत, यावरून आपला देश या तिन्ही अवस्था पाहिलेला असा आहे, हे उघड दिसते, ___ आपल्या हिंदुस्थानावर परदेशी लोकांच्या स्वाऱ्या येऊ लागल्यापासून व विशेषतः मुसलमानांच्या स्वान्यांपासून देशांत अनेक शतके अस्वस्थतेची गेली व त्यामुळे आमची घटना सर्व बिघडली असे आपले जुने ग्रंथ पाहिले म्हणजे दिसते. अस्वस्थतेच्या काळांत कोणताहि समाज एकमुखीच होत असतो व त्याप्रमाणे आज हिंदुस्थान फक्त राजसत्तेलाच योग्य राहिला आहे. गेल्या जर्मन महायुद्धांत इंग्लंद, फ्रान्ससारखी प्रजातंत्र राज्ये देखील बहतेक एकमुखी झाली होती व असली धुमश्चक्री पाचपन्नास वर्षे चालली तर ती केवळ राजसत्तेत योग्य होतील हे इतिहास जाणणारांस सांगावयास नको. जगाची परिस्थिति हल्ली बदलली आहे व या बदललेल्या परिस्थितीला हिंदुस्थानाला तोंड द्यावयाचे आहे. यासाठी जशास तसे या न्यायाने त्याला आपली सामुदायिक घटना केली पाहिजे, ही घटना आंगीं कशी आणावी, ती अंगवळणी पाडतांना तिच्यांतील दोष कसे टाळावे, फक्त गुणांचा मात्र संग्रह कसा करावा या गोष्टींचे विवेचन येथे करावयाचे आहे. ज्यावेळी राजशासनयंत्राला अमुक घटना देशांत रूढ व्हावी असे वाटते तेव्हां त्या घटनेला अनुकूल असे कायदे व सवलती ते यंत्र अमलांत आणते व याप्रमाणे घटनेला राजशासनाचा पाठिंबा मिळाला म्हणजे ती घटना सहज व लवकर अंमलांत येते. जपान देशाचे उदाहरण या नियमाचे प्रत्यंतरच आहे. हिंदुस्थानची स्थिति हल्ली मोठी चमत्कारिक झाली आहे. इंग्रज सरकारचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हां येथे सर्वत्र राजसत्ता चालू होती व लोकांस ही एकमुखी सत्ता अंगवळणी पडली होती. यासाठी त्याच धर्तीवर परिस्थिति व इंग्रज लोकांच्या मनोभावना विचारात घेऊन हिंदुस्थानच्या राज्यकारभाराची घटना करण्यांत आली.. स्वतः इंग्रज लोक प्रजातंत्र राज्यपद्धतीचे चहाते व हिंदुस्थानचे लोक राजसत्तेला सरावलेले म्हणून येथे मिश्र पद्धति अंमलात आणावी लागली..