पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाप्रकरण पाहल - संघस्थापना 1. हल्ली हिंदुस्थानांत जर कोणत्या गोष्टीची उणीव असेल तर ती सामुदायिक घटनेची होय. समुदायाचे सामर्थ्य वाटेल त्या वेळी वाटेल त्या ठिकाणी एकाग्र करण्याचे काम ज्यामुळे सुलभ होते अशा व्यवस्थित घटनेला सामुदायिक घटना हे नांव योजिले आहे. कोणतेहि मोठे काम करावयाचे म्हटले म्हणजे त्याला अनेक व्यक्तींची मदत लागते. या घटनेच्या अभावामुळे अनेक व्यक्तींची मदत होण्यास हिंदुस्थानांत अडचण पडते; इतकेच नव्हे; तर अशी मदत हल्ली मुळीच होत नाही. हिंदुस्थानांत कोणत्याहि कामास लागणारे सर्व प्रकारचे सामर्थ्य मुबलक आहे. पण केवळ घटनेच्या अभावी ज्या ठिकाणी जे सामर्थ्य पाहिजे त्या ठिकाणी नेमके तेच कमी पडते असा अनुभव येतो व त्यामुळे काम पार पडत नाही. इतकेच नव्हे तर अशा अव्यवस्थेमुळे देशाचे अनेक वेळां नुकसान होते. हल्लीच्या काळी हाती घेण्यास योग्य अशी मोठमोठी कामे-म्हणजे व्यापार, उद्योग, सराफीसारखे धंदे, कारखाने, गिरण्या, आगगाड्या वगैरे-करण्याच्या कामी हिंदुस्थान अगदीच नादान आहे. हे घटनासामर्थ्य समाजाच्या राजकीय घटनेप्रमाणेच असते. राजाच्या हाती सर्व सत्ता असणाऱ्या देशांत सर्व कामें एकमुखी असतात. शरीरांत एक आत्मा, घरांत एक गृहपति, समाजांत एक पुढारी, राज्यांत एक राजा व ब्रम्हांडांत एक ईश्वर अशी स्थिति असून सर्वत्र द्वैततत्वज्ञानाचा पगडा असतो. पण अशा देशांत सुद्धां गणसंस्था किंवा एकाखाली एक असे ठराविक अनुक्रम ठेवून कामाची शिस्तवार व्यवस्था करता येते. ज्या देशांत राजसत्ता नियंत्रित असते तेथें या सर्व घटना नियंत्रित स्वरूपाच्या असतात. तेथील तत्वज्ञान मद्धां विशिष्ट अद्वैत स्वरूपाचे असते. प्रजासत्तात्मक राज्यघटना असली म्हणजे सर्व व्यवस्था प्रजासत्तात्मक होते. अशा देशांत तत्वज्ञानसुद्धां पूर्ण अद्वैती असते, प्रत्येक इसमाला आपल्या कार्याच्या प्रयत्नाच्या जोरावर प्रत्यक्ष