पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ भावी हिंदी स्वराज्य [प्र०८ भांडवलाचे होत, यांत अनेक लोकांनी, भागीदारांनी भाग घ्यावा लागतो व यांना पुष्कळ विशिष्ट ज्ञान, यंत्रकौशल्य व व्यवस्थापकता लागते. हिंदुस्थान देशांत काढता येण्यासारखे असे मोठ्या भांडवलाचे धंदे म्हणजे खालील होत: १ सूत व कपड्याच्या गिरण्या, कापूस, रेशीम व लोकर, २ धातू काढणे. नील लोह ( मांगानीज ), शिंसें, तांबे वगैरे. ३ लोखंड ओतणे व पोलाद करणे. ४ यंत्रे तयार करणे. ५ जहाजे व आगबोटी बांधणे. ६ रासायनिक धंदे-विशेषतः रंग, तेजाब, पापडखार व कृत्रिम खतें ( हाडे वगैरेंची). ७ कांच, चिनीमाती व सिमीट, .. ८ कागद, त्याच्या रांध्यासह. ९ चामड्याचे काम. १० साखर. . कानडा, जपान, जर्मनी या देशांत हे धंदे पहिल्याने सरकारनेच सुरू केले व नंतर सरकारच्या मदतीने व उत्तेजनाने चालले आहेत. हिंदुस्थानांतसुद्धा सरकारने याप्रमाणेच सुरुवात व संरक्षण केले पाहिजे. पहिल्याने सरकारला लागणाऱ्या या सर्व जिनसा त्यांनी येथे तयार करण्यास सुरुवात करावी व बाहेरील मालावर जबर जकात ठेवावी म्हणजे पुरे आहे, असल्या कारखान्यांना पंधरा लक्षांवर प्रत्येकी भांडवल पाहिजे व भागीदारीच्या पद्धतीनेच ते उभारणे शक्य आहे. घरगुती उद्योगधंदे म्हणजे लोकांना आपल्या घरोघर आपल्याच घरच्या माणसांच्या मदतीने चालविता येतात असे धंदे होत. यांना लागणारे साहित्य त्या गांवांत उत्पन्न होते अगर बाजारांत येते व त्यासाठी लागणारे भांडवल व मंजुरी हे लोक सावकार वगैरेपासून मिळवू शकतात. असल्या धंद्यांत, हजार पांचशांपासून पन्नास हजारांच्या आंत सगळी उलाढाल असते. कच्च्या मालाचा पुरवठा होतो असल्या सर्व जिनसा या काम करणाऱ्यांच्या हातून तयार होतात. या जिनसा तयार करणे