पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वै.] उद्योगधंद्यांची तयारी ____जगांतील सर्व देशांत याप्रमाणे उद्योगधंद्यावर भर देण्यात येत असतांना हिंदी लोकांचे जीवनसर्वस्व म्हणजे शेती असून उद्योगधंद्यांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. शेतीची रड मागील प्रकरणांत सविस्तर सांगितलीच आहे. ही स्थिति बरोबर नाही, हे सर्व जगाचा अनुभव व हिंदुस्थानची प्रत्यक्ष स्थिति सांगतच आहे. एका काळी हिंदी कारागिरीच्या जिनसा परदेशी जात व त्यांस तेथे अतिशय मान होता. परंतु पूर्वीची काम करण्याची पद्धति जुनी घुराणी व रद्द ठरली व नवीन यंत्रं वगैरेंची वाढ देशांत बरोबर झाली नाही. हल्लों हिंदुस्थानांतून कच्चा माल परदेशी जातो व त्याच मालाचा झालेला पक्का माल हिंदी लोकांना सव्याज किंमत देऊन घ्यावा लागतो. उदाहरणार्थ विलायत व जपान येथे कापूस हिंदुस्थानांतून जातो व त्याचे कापड होऊन हिंदुस्थानांत येतें. जवस वगैरे धान्ये हिंदुस्थानांतून फ्रान्समध्ये जातात व त्यांचे तेल व वार्निश तिकडून हिंदुस्थानांत येते, फार काय पण चाकू वगैरेंच्या मुठी करावयाचे दगड हिंदुस्थानांतून जर्मनीस जातात व त्यांच्या मुठी व जिनसा होऊन हिंदुस्थानांत परत येतात. याप्रमाणे देशाचे दुहेरी नुक न होतें. मजुरी आपल्या देशास मिळत नाही व व्याज व नफा शिवाय दुसऱ्यांना द्यावा लागतो. पूर्वी हिंदुस्थानांतील लक्षावधि लोकांना जे धंदे पं टाला देत ते याप्रमाणे नाहीसे झाल्याने हे लोक हल्ली अन्नाला महाग झाले. शेतीवर जे काही उत्पन्न होईल त्यांतून स्वतःचा निर्वाह करून शिवाय त्यातूनच ही पक्क्या मालाची मजुरी व नफा द्यावा लागतो. हा जो द्रव्यशोष होत आहे हा बंद करता येण्यासारखा आहे. सरकार व जनता या दोघांनी थोडें मनावर घेतले तर हिंदुस्थानांत लागणारे सर्व कापड, लोखंडी सामान, चामड्याचे सामान व किरकोळ सर्व गोष्टी हिंदुस्थानांतच पुरेशा करता येतील. त्यासाठी परदेशाकडे आपल्याला एक पैभर सुद्धा पाहण्याची जरूर नाही. सर्व कच्चा माल, सर्व मजुरी. -सर्व भांडवल देशांतच मिळण्यासारखे आहे व शिवाय लोकांना इतके काम मिळेल. स्थूलमानाने देशांतील धंद्यांचे तीन प्रकार होतात. (१) मोठ्या भांडवलाचे, (२) साधारण भाडवलाचे व (३) घरगुती. ज्या धंद्यांना मोठमोठी अवजड यंत्रे, पुष्कळ भांडल व हजारों मजूर लागतात ते धदे मोठ्या