पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रकरण आठवें उद्योगधंद्यांची तयारी ___ कोणत्याहि देशाची उत्पादकशक्ति व तेथील रहिवाशांची कर्तृत्वशक्ति यांची माहिती त्याच्या उद्योगधंद्यावरून होते व त्या देशाच्या सामर्थ्यांची व संपन्नतेची साक्ष पटते. जर एखादें यंत्र हिंदुस्थानांतच सर्वस्वी तयार झाले तर ते आपणांस अगदी जसे पाहिजे तसे होईल व जे पैसे परमुलखीं जावयाचे ते देशांतील देशांतच ठेवील. केवळ शेतीवर निर्वाह करणारा देश नेहमी दरिद्रीच रहणार. " केदारपोषणरताः' शतीवर निर्वाह करणारे लोक म्हणजे नुसते बायकोचे व आपले पोट भरणारे लोक असें कौटि. ल्याने म्हटले आहे. हल्ली तर हिंदुस्थानांत शेतीवर इतके लोक अवलंबून आहेत की, त्यांना त्या धंद्यांत एक वेळचे पोट भरण्याची देखील भ्रांत पडते. हिंदुस्थान असो की, दुसरा एखादा देश असो. त्याला उद्योगधंद्याशिवाय सधन होणे, थोडी तरी पत राखणे किंवा साधारण संपन्न म्हणविणे अशक्य आहे. हिंदुस्थानांतील उद्योगधंद्यांची इतर देशांतील उद्योगधद्यांशी तुलना केली तर काय दृष्टोत्पत्तीस येते पहा. सन १९१४ साली जगांतील देशांत उद्योगधंद्यांत खालीलप्रमाणे भांडवल गुंतलेले होते. देशाचे नांव भांडवल पौंड लोकसंख्या ग्रेटबिटन २,७३,७०,००,००० १० कोटी सुमारे कानडा ३९,००,००,००० १ कोटी संयुक्त संस्थाने . ४,५५,८०,००,००० २० कोटी सुमार जपान २४,३०,००,०००.६ कोटी हिंदुस्थान हिंदी लोक ६,००,००,००० ३० कोटा हिंदुस्थान व इंग्रजसुद्धा ४७,१०,००,००० ३१ कोटी हिंदुस्थानाची उद्योगधंद्याची काय स्थिति आहे हे वरील आंकडे चांगले -सांगतात. वर्णनाने यापेक्षा जास्त चांगली कल्पना येऊ शकणार नाही.