पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व.] शेतीविषयक तयारी १२५ देशांतून चारपंचमांश लोकसंख्येला वाटेल त्याप्रमाणे अधिकारी सर्व व्यवस्था करून देतात व यामुळे शेतकरी व नमुनेदार शेते यांचा एकजीव होतो व कामे करण्याची उमेद व धमक उत्पन्न होते. मग ही कामें पार पाडली म्हणजे उत्साह व एकी वाढते व याप्रमाणे सर्व शेतकरी जागे होतात. हिंदुस्थानांत दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास व एकी उत्पन्न करणे ही होय. एकदां विश्वास वाढला व एकी झाली की, वाटेल ते करता येईल, अशा त-हेने दुष्काळाला सुद्धा देशांतून हांकून लावता येईल. दरएक कुटुंबाने थोडें धान्य शिल्लक टाकले, अशा शिलकेची सामुदायिक कोठारें केली, शेण जाळण्याची पद्धत बंद केली, जळणाकरतां जंगले राखली, श्रमाऐवजी यंत्रे वापरली व नवीन धंदे सुरू केले तर काय होणार नाही? अशा रीतीने एक साल गेले तर आपलें किती हित झाले हे प्रत्येकाला स्पष्ट दिसेल. अशी एकदां जुटीने कामे करण्याची गोडी लागली म्हणजे कोणतेहि काम अशक्य राहणार नाही. याप्रमाणे आळस झाडला, काम करण्याची लाज जाऊन होस वाटू लागली, निरर्थक भपका जाऊन साध्या राहणीने आरोग्य व संपत्ति वाढली म्हणजे सुख व समाधान वाढेल व फाटाफूट व भांडणे मोडतील, . सरकारने देखील प्रत्येक तालुक्याच्या व जिल्ह्याच्या शेतीची सुधारणा व पिकाची वाढ कशी करावयाची हे ठरवून त्या धोरणार्ने कामें सुरू करावीत, त्याचा परिणाम काय झाला हे प्रसिद्ध करावे. व दर सालांत कोणती कामें केली व त्याचा काय परिणाम झाला हे प्रसिद्ध करावे. हिंदुस्थानांतील शेतीपासून मोठी संपत्ति प्राप्त होईल असे नाही, पण वर सांगितल्याप्रमाणे व्यवस्था केल्यास दहा पंधरा वर्षांत लोकांचे उत्पन्न दुप्पट होईल व सुखसमाधान वाढेल. शेतीची वाढ, पाण्याची सोय, पिकाच्या पाळ्या, मौल्यवान पिकांकडे लक्ष, खतांचा उपयोग, व गुरांची जोपासना ही कामें पहिल्याने हाती घ्यावी: लोकांना स्वतंत्रता देऊन त्यांच्या दिमतीस तज्ञ द्यावेत. “राजकीय स्वराज्या"च्या भागांत सांगिल्याप्रमाणे ग्रामपंचायती स्थापून त्यांना आधिकार दिले तर लोक आपली व्यवस्था करून घेतील व मग सर्व गोष्टी वर लिहिल्याप्रमाणे करता येतील.