पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०७ कशी निभते हीच भ्रांत; तर सांठा कशाचा करणार ? कित्येक वेळी पीक येण्यापूर्वीच ते गहाण टाकलेले असते. मागचा पुढचा विचार करण्यास फुरसतच नसते.' शीर सलामत तो पगडी पचास' किंवा 'जीवन्नराभद्रशतानि पश्यति' या म्हणीप्रमाणे जीव जगविण्याकडे त्याची प्रवृत्ति असते. हल्ली हिंदुस्थानांतील शेतीला 'जडत्व' आले आहे. लोकांची जी निराशा व निरुत्साह झाला आहे तो घालवून त्या ठिकाणी पहिल्याने उमेद व उत्साह उत्पन्न केला पाहिजे, या गोष्टींशिवाय नवा दम व जोम उत्पन्न होणार नाही व त्यावांचन यश मिळणे अशक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे जगांतील लोक काय करीत आहेत हे त्यांस दाखविणे हा होय. दर एक गांवांतील एक पुढारी शेतकरी याप्रमाणे हजार पांचशे शेतकरी दरसाल जपान, चीन या देशांतून फिरवून आणले पाहिजेत. या फिरस्यांत धनिक, शिक्षक, शेतकरी, मामलतदार व पदवीघर यांचा समावेश झाला पाहिजे. हे लोक जी माहिती व जे नमुने आणतील ते त्या जिल्ह्यांतील पदार्थसंग्रहालयांत ठेवावे. परत देशी आल्यावर त्यांनी आपण पाहिलेल्या गोष्टी त्या जिल्ह्यांतील लोकांस सांगाव्या. जिल्ह्याचा सर्व कारभार हिंदुस्थानचे कल्याण करण्याच्याच उद्देशाने अगदी बदलल्याशिवाय कांहींच सफल होणार नाही. गांव, तालुका अगर जिल्हा यांतील कोणतेंहि काम लोकांनी स्वतःच्या हातांनी व हिमतीवर एकीने करण्याची वहिवाट पाडली पाहिजे. रस्ते, पूल, तळी, पाट, मोया, वगैरे सर्व कामें लोकांनी आपली आपण करून घेतली पाहिजेत. हल्लीच्या पद्धतीने ही कामें सरकारी अधिकारी आपल्या हुकमाने करतात व त्यामुळे लोकांची, ही कामे करण्याची हिंमत नाहींशी झाली आहे. याशिवाय लोकांचा प्रत्यक्ष कामाशी संबंध तुटल्यामुळे त्यांत जीवंतपणा राहिला नाही. याप्रमाणे या हिंदुस्थानच्या मृत देहांत किडे पडून त्याचे शेण होण्यापूर्वी त्यांत नवीन जीव घातला पाहिजे, हा जीव त्यांना स्वतंत्र सत्ता दिल्यावांचून येणार नाही. हिंदुस्थानांत मजूर, भांडवल, पुढारीपण व चातुर्य यांचा भरपूर संग्रह आहे पण तो कुलपांत पडलेला आहे अगर विसकटलेला आहे. त्याची नवी घडी नीट घालून, त्याला व्यवस्थित स्वरूप देऊन, एकमुखी करून कार्यक्षम केले पाहिजे. इतर