पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेतीविषयक तयारी १२३ पाटबंधारे व कालवे यांचा विचार पुढे देशाची भौतिक सुधारणा या सदरांत केला आहे म्हणून येथे करीत नाही, आजपर्यंत अंकानुमानशास्त्र व त्यासाठी गोळा करण्यांत येणारी माहिती यांची किंमत लोकांना समजत नव्हती. हा एक सरकारी अघिकाऱ्यांनी रयतेला त्रास देण्याचा मार्ग काढला आहे असे लोक समजतात. पण ही समजूत फार चुकीची आहे. नानाप्रकारच्या माहितीचे आंकडे असल्याशिवाय सुधारणा व उद्योगधंदे कोठे व काय होण्यासारखे आहेत हें समजणार नाही. शेतकी संस्था व उद्योगधंद्यांच्या संस्था यांना ही माहिती फार उपयोगी आहे व यासाठी किती क्षेत्रांत, कोणते पीक किती आले व शेतकऱ्यांनी दुसरे कोणते धंदे करून काय पैदा केले ही तपशीलवार माहिती गोळा केली पाहिजे व प्रसिद्ध केली पाहिजे. ही माहिती कोणाहि साधारण सुशिक्षिताला समजेल अशी खातेवार जंत्र्या करून प्रसिद्ध करावी. याचा अभ्यास करून त्यापासून योजना तयार करण्याचे काम कांहीं पंडितांकडे द्यावे व त्यांनी याबाबद निरनिराळे प्रांत व देश यांची तुलनात्मक कोष्टकें प्रसिद्ध करावी. अशा तुलनेपासून आपले दोष व गुण समजून येतात, आणि त्यांत योग्य ती सुधारणा घडवून आणण्यासाठी इतर ठिकाणची व्यवस्था पहाणे, तिची माहिती घेणे व तिचा उपयोग आपल्याकडे करणे या गोष्टींचा उपयोग होतो. याच माहितीत शेतकऱ्यांची साधारण स्थिति, प्रत्येकाचे सरकारी क्षेत्र, दुभती व इतर जनावरे यांची संख्या, त्यांचे भांडवल, (यांत हत्यारे बी बियाणे, दाणागोटा यांचा समावेश व्हावा) त्याला असलेले कर्ज, शेताचे उत्पन्न, कुटुंबांतील माणसे, हंगामांत लागणारे लोक, पाण्याचे जमीनीखालील खोलीचे व उंचीचे माप, वगैरे गोष्टी असाव्या. दर तीनचार वर्षांनी दरिद्री भागाची व दहा वर्षांनी सर्व भागाची, याप्रमाणे खानेसुमारी घ्यावी. _हिंदुस्थानाला नेहमी मारण्यांत येणारा टोमणा म्हणजे हा देश अधीर आहे. मिळाले की खाल्लें; उत्पन्न यावयाचा अवकाश की फडशा, अशी याची स्थिते आहे हा होय. पण खरे पाहिले तर नाइलाजास्तव त्याला हा मार्ग स्वीकारावा लागतो. पन्नास वर्षांपूर्वी पंवांत धान्य व गंज्यांत गवत एक सालापुरते तरी सांठविण्याचा प्रघात होता. पण हल्ली चालू वेळ