पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ भावी हिंदी स्वराज्य [प्र.७ (७) समाईक शेतीचा अभाव व त्यामुळे सुधारणा नाहीत. का (८) घरधंदे बुडाले. रिकामा वेळ वाया जातो. आळस वाढला. ही पत फिरून येण्याला शेतक-यांच्या पतपेढ्यांचा थोडासा उपयोग आहे. हल्ली चार प्रकारच्या पतपेढ्या अस्तित्वात आहेत. (१) कर्ज देणाऱ्या, (२) माल खरेदी करणाऱ्या, (३) माल विकणाऱ्या व (४) सुधारणा करणाऱ्या. यांपैकी पहिल्या प्रकारच्याच सोसायट्या फार आहेत. पण मुख्य गोष्ट म्हणजे शेतक-यांना घरगुती धंदे शिकवून त्यांचा रिकामपणचा वेळ पैसे मिळविण्यांत खर्च होईल असे केले पाहिजे. शेतें लहान व शेती पावसावर अवलंबून, यामुळे शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा महिने रिकामपण असते. या रिकामपणांत उपयुक्त काम करून पैसे मिळविण्याचे साधन त्याला करून दिले पाहिजे, पाऊस नीट पडला नाही तर त्यांचे हाल होतात व दुष्काळ पडल्यास त्यांस उपाशी मरावे लागते, ही स्थिति पालटली पाहिजे, नवीन धंदे त्यांना लावून देणे हा अगदी जगावे कां मरावे इतक्या महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा सविस्तर विचार धंदे या सदरांत येईल. - शेतीबरोबर सहज रीतीने करता येणारे धंदे म्हटले म्हणजे फळें राखणे, दुभत्याचा धंदा, रेशमाचे किडे, मधमाशा, लांखेचे किडे वगैर पाळणे, सूत काढणे, विणणे, गुरेढोरे पाळणे, पांखरे पाळणे व औषधी वनस्पतींची जोपासना हे होत. शिवाय सुतार, लोहार, गवंडी, न्हावी, धोबी हे धंदे शेती संभाळून करता येतात. कागद करणे, कांच करणे, खेळणी करणे, गंजिफाक व पायमोजे विणणे वगैरे बरेच बारीकसारीक धंदे जपानी शेतकरी रिकामपणी करतात. जंगलाजवळ जंगली जिनसांच्या वस्तु करणे व समुद्रकांठी मासे धरणे व खारवणे हेहि धंदे शेतकऱ्यांनी करण्यासारखे आहेत. ज्या ठिकाणी जो धंदा करणे सोईचे असेल त्या धंद्याचे शिक्षण मुलांना शाळेंत द्यावे. त्यांना ते धंदे चालविण्यास भांडवल पुरवावे व तयार झालेल्या जिनसा तेथेच विकत घेऊन नेऊन खपविण्याकडेच कित्येक संघांनी लक्ष पुरवावें. उद्योगधंद्याच्या मंडळींनी व अधिकाऱ्याना शेतकऱ्यांना वेळोवेळी लागेल ती मदत द्यावी व याप्रमाणे शेताची हेळसाड न होतां शेतकऱ्याला जास्त उत्पन्न होईल अशी तजवीज झाली पाहिज