पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] शेतीविषयक तयारी १२१ अनुभवांत कितपत पटतो हे पाहणे व ते लोकांच्या निदर्शनास आणून देणे ही कामें या दुय्यम शिक्षितांची 'होत. प्रयोगशाळेतील सिद्धांत अनुभवास न उतरला तर युनिव्हर्सिटी त्यांचा फेरविचार करीलच. हिंदुस्थानांतील शेतीखात्यांत शेतकीच्या मेस्त्रींची आवश्यकता आहे, प्रयोगशाळा व शेतकरी किंवा शेतकरीसंघ यांच्या दरम्यान माहिती पोचवून प्रयोगशाळेतील सिद्धांत शेतकऱ्यांकडून अमलात आणण्याचे काम यांना दिले पाहिजे. हे स्वतः शेतकरी असावे, यांनी स्वतःच्या हाताने कामें करून माहिती द्यावी व तिचा त्यांनी सर्वत्र प्रसार करावा. याशिवाय गुरांची जोपासना, त्यांची निपज, त्यांचे रोग वगैरेबाबद प्रयोग करून सिद्धांत काढणाऱ्या प्रयोगशाळा उघडल्या पाहिजेत. शेतकीसंघ व शेतें यांना जोडून व्याख्यान, प्रयोग, संभाषणे, उपदेश वगैरेंनी शेतीत सुधारणा कशा कराव्या हे दाखविणारे माहितगार दरएक जिल्ह्यास एक तरी असून त्याने गांवोगांव व्याख्याने वगैरे द्यावी, काम करून दाखवावें, लोक त्याप्रमाणे करतात किंवा नाही हे पाहून ते कोठे चुकतात, चूक कशी सुधारावी वगैरे गोष्टी समजाऊन द्याव्या अशी योजना केली पाहिजे, : गेल्या पन्नास वर्षांत शेतकऱ्यांची फार दैना झाली असून त्यांची पत अजिबात गेली आहे. याची मुख्य कारणे खालील आहेत. (१) लोकांस दुसरा धंदा नसल्याने सगळ्यांचा मारा शेतीवर आहे. (२) वांटण्या होता होतां दरएक शेताचे लहान लहान तुकडे झाले आहेत. यंत्रांचा उपयोग सुरू नसल्याने मोठमोठी शेतें पडीत पडतात. त्यांना जरूर ती गुरे व माणसें नाहींत. शेतकऱ्यांचा कायदा, या कायद्याने शेतकऱ्यांना विशेष सवलती देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे अहित मात्र केले. (५) शेतसाऱ्याची वेळ, ही वेळ शेताचे उत्पन्न विकून पैसे हाती येण्याच्या पूर्वीची असल्याने वाटेल त्या भावाने पीक विकून पैसे उत्पन्न करावे लागतात. (६) अडते व सावकार हे एकच गृहस्थ असून शिवाय ते परदेशी धान्य पाठविणाऱ्या कंपन्यांचे नोकर असतात.