पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०७ तात्पर्य, शेतकी शाळेत प्रत्यक्ष शेतात काम करणारे लोक जितके जमवितां येतील तितके जमवून शास्त्रशुद्ध रीतीने शेती कशी करावी हे त्यांजकडून करून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना नवीन शेतीपद्धति कशी फायदेशीर होते हैं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन पटवून द्यावे. या शेतीशाळांतून जमीन व तिची मशागत, बी, गुरेढोरे, गोठे व घरे यांची व्यवस्था, बाजारचा व्यवहार, जमाखर्च व शेतकीला जोडून फुरसतीच्या वेळी घरोघर करतां येण्यासारखे सत काढणे वगैरे धंदे हे विषय सप्रयोग शिकवीले पाहिजेत. या शिवाय गांवकामगार व तालुक्याचे अधिकारी यांनी या नवीन शिकविलेल्या व्यवस्थेशीर पद्धतीने लोक कामे करतात किंवा नाही यावर नजर ठेवून चुकत असेल तेथे समजावून दिले पाहिजे, अडाणी लोकांना कोणतेंहि शास्त्रीय तत्व पटवून द्यावयाचा एकच मार्ग आहे व तो हा की व्यवहारज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यांनी ती गोष्ट फायदेशीर आहे असे दाखवून द्यावे, यासाठी शेतकन्याला आपल्या शेतांत काय सुधारणा कराव्या याचा विचार करण्याची, त्या योजना अमलांत आणून किती व कसा फायदा होतो हे पहाण्याची, त्याला नवीन सुधारणा तज्ञांनी सुचविण्याची साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. विचार करून काही तरी सुधारणा अमलांत आणण्याची सवय ही अत्यंत महत्त्वाची संवय आहे व ही संवय लहानपणापासून लागेल असा शिक्षणक्रम ठेवला पाहिजे. बायकांना देखील विचार करण्याची, कामें करण्याची, उत्पन्न वाढविण्याची, काटकसर करण्याची संवय लाविली पाहिजे. । ज्यांची शेती उत्तम चालत आहे त्यांच्या शेतावर आठचार दिवस राहून तेथे कामाची व्यवस्था व टापटीप कशी ठेवतात, त्यापासून हित कसे होते हे पहाण्याचे प्रसंग अडाणी शेतकऱ्यांस आणले पाहिजेत. शाळांतून याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभविक शिक्षण मिळाले पाहिजे. युनिव्हर्सिटींत शेतकीचे नवे शोध, शेतांची शास्त्रीय जोपासना, शेताबद्दल व्यवस्थित मांडणी करून उत्तम व रगड पीक काढण्याची पद्धत, पिकांत सुधारणा करण्याचे मार्ग, अडचणींशी झगडण्याची युक्ति यांच्या शोधांचे शिक्षण मिळावें. युनिव्हर्सिटीत लागलेले शोध अमलांत आणू शकतील असे शेतकरी तयार करण्याचे दुय्यम शिक्षणाचे वर्ग पाहिजेत. सांगितलेल्या पद्धतीने बरोबर काम करून प्रयोगशाळेत ठरलेला सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारांत व