पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेतीविषयक तयारी ही चोरी चोराच्या मालमत्तेतून, त्याच्या श्रमांतून, त्याच्याकडून मालकासाठी काम करवून भरून मिळाली पाहिजे अगर सरकारी पोलीस खात्याने ती भरून दिली पाहिजे. सारा किंवा कर हा एक विम्याचा हप्ता आहे व हा हप्ता बरोबर मिळतो तोपर्यंत झालेले नुकसान विमा कंपनीने भरून दिले पाहिजे, हे नुकसान भरून देणे हे त्या कंपनीचें कर्तव्य आहे. जपान देशांत बहुतेक खेड्यांतून सुद्धा असल्या शेतकी संस्था आहेत व याप्रमाणे सगळा देश एक शेतकी संस्थांचे जाळे आहे. सगळ्या देशाची एक मध्यवर्ती मंडळी, दरएक जिल्ह्याचे एक एक स्थानिक मंडळ व शेवटी दरएक शहर अगर खेड्याचे मंडळ याप्रमाणे त्या देशांत एकंदर अकरा हजार शेतकी संस्था आहेत. या शेतकी संस्थांना जोडून कायद्यानेच निर्माण केलेले कारागिरांचे संघ आहेत. या कारागिरांच्या संघांचे काम म्हणजे कारागिरीच्या जिनसांची निपज व उत्तमपणा यांची वाढ करावयाची हैं आहे. याशिवाय व्यापारी लोकांनी कसबी लोकांना उत्तेजन देण्यासाठी खाजगी संस्था काढलेल्या आहेत त्या निराळ्याच. या सर्व मंडळ्या एकंदर देशाचे हित पाहतात व मधूनमधून विचार विनिमय करणे, नवीन सूचना व योजना अंमलात आणणे व आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेणे यासाठी या मंडळ्यांच्या प्रमुख लोकांच्या सभा भरत असतात. _हिंदुस्थानांत काही थोडी नमुनेदार शेते व शेतकी शाळा आहेत म्हणून वर सांगितलेच, पण त्यांचा शेतकऱ्यांशी संबंध येण्यासाठी त्या संस्था शेतकऱ्यांच्या संघांच्या ताब्यात दिल्या पाहिजेत. हे शेतकऱ्यांचे संघ हुशार शेतकरी व धनिक पुढारी यांचे बनविले पाहिजेत. या संघांनी सामान्य शेतकांत या संस्थांच्या माहितीचा फैलाव केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी दरएक तालुक्यांत शेतकरी लोकांचा संघ मागेल तेथें एक शेतकी तज्ञ व त्याच्या देखरेखीखाली शेते दिली पाहिजेत. या शेतांवर व शेतीच्या कालेजांतून प्रयोगशाळा असून शेतास उपद्रव देणाऱ्या जीवजंतु, रोग वगैरेवर उपाय शोधण्याचे काम चालावें. ज्या वेळी शेतकऱ्यांना रिकामपण असते त्या काळांत या शेतांवर शेतकामांत काटकसर कशी करता येईल हे शेतकऱ्यांना फुकट शिकवावे व त्यांजकडून तसे करून घ्यावें,