पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपोद्घात मागून घडली असे कोणी समजू नये. पण त्याच वेळी अमुक गोष्ट अगोदर यावी व अमुक मागाहून यावी ही गोष्ट केवळ यदृच्छेनेंहि घडलेली असेंहि नाही. विचाराला एक प्रकारचा सुसंगतपणा यावा, विचार एका पायरीवरून सहज सोयीने वर चढत जावें, पुढे जात असतांना विचाराचा ओघ नीट चालावा व विवेचन सुगम व्हावे म्हणून विषयाची ही विशिष्ट मांडणी पत्करली आहे. ___ कोण याहि गोष्टीचे अंतिम ध्येय काय हे जर स्पष्ट डोळ्यापुढे असले तर अनेक वळणे आली तरी ध्येयाकडेच जाण्याचा रोख आपणांस ठेवतां येतो. रस्त्याने जातांना आपण आपल्या ठिकाणाकडे काही नीट सरळ रेषेत जात नाहीं; इतकेच नव्हे, तर कित्येक वेळां आपण उद्दिष्ट स्थळांच्या अगदी विरुद्ध दिशेससुद्धा जातो. पण ती विविक्षित अडचण संपल्याबरोबर योग्य दिशेकडे जाण्याची जाणीव ठेवून आपण खबरदारी घेत असतो. राष्ट्राच्या उन्नतीचे काम असेच आहे. यांत परिस्थितीप्रमाणे अनेक वळणे व केव्हां केव्हां कांहीं भागी माघारहि घ्यावी लागते. अशा वेळी सामान्य माणसाची दिशाभूल होऊ नये म्हणून त्याच्यापुढे अंतिम ध्येय स्पष्ट असल्यास बरें पडते. अंतिम ध्येय अमुक आहे, पण काहीतरी अडचण आल्यामुळे ही माघार घेतली असली पाहिजे असे जाणून माघार घेतल्याने तो घाबरत नाही. पण कोणत्या अडचणी टाळण्यासाठी माघार घेतली हे तो पहात असतो. हा विचार करण्याची बुद्धि सामान्य माणसांत उत्पन्न झाली म्हणजे एकंदर समाजाचे त्यापासून हित होते. यासाठी या अंतिम ध्येयाचे सामान्य स्वरूप जनतेपुढे मांडणें अवश्यक आहे.