पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ भावी हिंदी स्वराज्य [प्र. ७ माफक वाटणी या गोष्टी पण शेतकऱ्यांना शिकविल्या पाहिजेत. आउतासंबंधाने म्हटले म्हणजे देशी आउलांत सुधारणा पाहिजे ही गोष्ट खरी, पण परदेशी आउत घेण्यास लागणारा पैसा, त्यांच्या दुरुस्तीत येणाऱ्या अडचणी, त्यांच्या उपयोगांत होणारा त्रास या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. ही हत्यारे तयार करण्याचे, ती दुरुस्त करण्याचें, मोडकी हत्यारे घेण्याचे काम करणारी माणसें जागोजाग दरएक तालुक्यास निदान एक संस्था निघाल्याशिवाय त्यांचा प्रसार योग्य रीतीने होणार नाही. ही कामें करणारे स्वदेशी कारखाने जागोजाग झाल्यावर ही यंत्रे वापरण्यास अडचण किंवा हरकत नाही. तोपर्यंत यांसाठी परदेशी पैसे पाठविणे इष्ट व श्रेयस्कर नाही. या गोष्टींवांचून अडले आहे असे नाही व यासाठी परदेशचीहि हत्यारे खरेदी करूं नयेत, स्वदेशी कारखाने जागोजाग झाले म्हणजे तेथे नांगर, पंप, कापणी वगैरेंची यंत्रे, हातगाड्या व अशीच थोड्या श्रमांत व खर्चात पुष्कळ काम करणारी आयुधे वाटेल तितकी ध्यावी व ही मोकळी झालेली माणसें दुसरी यंत्रे व कारखाने चालविण्यांत वापरावी. - दुसऱ्या प्रकारची मोठमोठी कामें करण्यासाठी शेतकऱ्यांचे संघ असावे. ही कामें एकट्यादुकट्याने करावयाची नसतात. अनेक माणसे एकत्र होऊन त्यांनी व्यवस्थित व. पद्धतशीर ताली बांधाव्या, धरणे बांधावी, पाट काढावे, पाण व पवनचक्क्या चालवाव्यात, म्हणजे शेतीला अनेक प्रकारे मदत होईल, अशी कामें संघांनी करण्याला उत्तेजन देणारे कायदे करावे, त्यांना जरूर त्या सवलती द्याव्या, सरकार अगर सरकारी अधिकारी यांची तब्बेत या कामी मालक असूं नये, ठराविक गोष्ट, ठराविक पद्धतीने गरीब रंकापासून श्रीमंत रावापर्यंत, अधिकाऱ्यांच्या जिवलग दोस्तांपासून कट्टया शत्रूपर्यंत सर्वांना हक्काने मिळाव्यात व त्याचा फायदाहि ठराविक नियमा प्रमाणे सर्वांना सारखा व बिनहरकत मिळावा असा बंदोबस्त पाहिजे. कोंडवाड्याच्या कायद्यांत मालाची नुकसान भरून मिळाली पाहिजे. चोरीच्या कायद्यांत चोरीची किंमत भरून मिळण्याची सोय पाहिजे. नुसता गुराच्या मालकाने सरकारला दंड देऊन मालकाचे नुकसान भरून येत नाही. चोराला कैद किंवा दंड होऊन चोरी झालेली भरून येत नाही.