पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य . [प्र०७ पडत नाही. साधारणपणे शेतकन्यांचा अडत्या व सावकार एकच असतो व यामुळे चारी बाजूंनी त्याचा मात्र फायदा होतो. अशा कारणामुळे ज्याला 'रयत' म्हणतात तो शेतांत खपणारा इसम उद्योग अगर सुधारणा याबद्दल उदासीन होऊन कोणीकडून तरी आयुष्य घालवावे व पोट भरावे याच्या मागे असतो. शहरांत चांगला प्रामाणिक अडत्या व खेड्यांत त्याचा संबंधी शेतकरी अशी जोडी पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतांत में पिकेल ते त्याने अडत्याकडे पाठवावें व शेतकऱ्याला जे काही लागेल तें अडत्याने पुरवावे अशी सहकारिता या दोघांत पाहिजे, या अडत्याने जगाशी व्यवहार ठेऊन आपल्याकडे येणारे शेतकऱ्याचे उत्पन्न जास्तीत जास्त किंमतीला विकावे व शेतकऱ्याला लागणारे सर्व सामान कमीत कमी किंमतींत पुरवावें व होणारा नफा दोघांनी सारखा घ्यावा असा व्यवहार झाला तर तो हितकर होईल. सहकारी संस्थांनी हे काम करावयाला पाहिजे, एकंदरीत तात्पर्य हे आहे की, तीसबत्तीस कोटी शेतकऱ्यांची सुधारणा, कामांत चूर असलेल्या, सर्वज्ञतेच्या घमंडीने व श्रेष्ठकनिष्ठत्वाच्या दोऱ्यांनी जखडलेल्या, जित व जेते यांची जाणीव पदोपदीं मनांत वागविणाऱ्या हजार पांचशे अधिकाऱ्यांच्या हातून होणे शक्य नाही. तशांत हे अधिकारी या कामांतील विशिष्ट योग्यता असलेले. त्यांना त्या कामाची मोठी हौस असलेली, त्या कामासाठी त्यांचा जीव तिळतिळ तुटत असलेले अंशी स्थिति 'असती तर सुधारणेच्या रस्त्याला लागण्यांचा तरी ते प्रयत्न करते, पण बोलून चालून परकी, ज्यांचा स्वार्थ बलवत्तर, मी म्हणतो तेच खरें व तसेच झाले व असले पाहिजे असा ज्यांना तोरा, सर्व शेतकरी हे ज्यांना घरच्या कचऱ्यांपेक्षां सुद्धां हलके वाटतात अशांच्या हातून काही झाले नाहीं यांत कोणाहि विचारी माणसाला आश्चर्य वाटणार नाही. यापेक्षा निराळा प्रकार दिसावा असे वाटत असले तर शेती खात्याची चालू घड़ी मोडून नवीन घडी घातली पाहिजे, अधिकारपरंपरेची सांखळी तोडली पाहिजे व प्रत्येकानें स्वतंत्र पण सर्वांची. एक सामान्य रचना याप्रमाणे संघशः सर्व देशांतील समंजस माणसांनी एक जोर केला पाहिजे, तेव्हां कांहीं तरी होणार आहे. लोकांचे सहज पुढारी असे जे मोठे जमीनदार यांच्या मदतीस शेतीचे तज्ञ देऊन सबंद गांवेची गांवे, यांची सुधारणा, त्या गांवांची परिस्थिति, त्या गांवांचे