पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वं. शेतीविषयक तयारी ११६ तरी खरोखर फायदा झाला असे सिद्ध झाले नाही व त्यामुळे त्या त्या जिल्ह्यांतील या शेत-सुधारणांचा परिणाम विस्तृत शेतीवर बिलकुल झालेला नाही. या शेतांवर काम करणारे सरकारी अधिकारी व शेजारचे शेतकरी यांमध्ये स्नेहसंबंधसुद्धा नाही. दोघेहि एकमेकांबद्दल सारखेच बेपर्वा आहेत. सरकारी शेत व शेतकऱ्याचे शेजारचे शेत यांमध्ये फलांत, उत्पन्नांत खर्चाच्या मानाने फरक दिसत नाही. सरकारी शेती करणारी माणसे शेतीची तज्ञ म्हणून स्वतःची शेती करीत नसून सरकारी नोकर म्हणून सरकारची शेते करीत असतात व त्यामुळे नफानुकसानी, उत्पन्न व खर्च, गरजा व सोई यांचा विचार न करतां पाश्चिमात्य देशांतील पद्धतीचे अनुकरण सरकारच्या हुकमानुसार त्या ठिकाणी करण्यात येते. त्या सरकारी शेतावर कळकळ, नवीन युक्ति, लोकांनी घेण्यासारखा कित्ता, प्रचंड उत्पन्न, नजर न ठरेसें पीक अगर आश्चर्यकारक व्यवस्था यांपैकी काहीच दृष्टीस पडत नाही. यावरून शेतीचे खरें ज्ञान तेथें नाहीं, सुधारलेल्या शेतीचे रहस्य तेथे नाही, पीक वाढविण्याची करामत तेथे नाही, हटकून अमुक गोष्ट घडवून आणीन अशी धमक तेथें नाहीं, कौतुक वाटेल अशी व्यवस्था तथे नाही, आश्चर्य वाटेल असा प्रभाव तेथे नाही असे लक्षपूर्वक पाहणारास वाटते. अशा स्थितीत आपली जुनी पुराणी व्यवस्थाच बरी वाटली तर शेतकऱ्यांचा काय दोष ? बेगडी सुशिक्षितांप्रमाणे नसते ढंग, वाईट प्रचार, फार खर्चाचे भपके, खोट्या गप्पा यांना ते बळी पडले नाहीत याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदनच केले पाहिजे, - सर्व शेतीसुधारणा, इंग्रजांचा व्यापार, अधिकान्यांचा दरारा व दिखाऊ भपका यांनी विटाळलेली असल्यामुळे त्यांत खाजगी भांडवल नाही, व यामुळे शेतीला पुरेशा भांडवलाचा पुरवठा नाही. व या सर्व बाबतीत आमूलाग्र बदल केल्यावांचून तिकडे लोक जाणार नाहीत है निःसंशय आहे. प्रत्येक ठिकाणची चमत्कारिक परिस्थिति, शेतकऱ्यांचे अज्ञान, धनिकांचें औदासिन्य, यामुळे शेतकऱ्यांचे संघहि स्थापन झालेले नाहीत. अशा संघांनी रशिया, जपान वगैरे देशांत शेती ही व्यापाराच्या पायरीवर आणली आहे. शेतकऱ्यांना योग्य अडत्याचे साहाय्य नसल्यामुळे त्यांच्या मालाची योग्य किंमत त्यांच्या पदरी PHHTHHHHHHH