पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.] शेतीविषयक तयारी सामर्थ्य व त्या गांवांची ऐपत पाहून एकीने सुधारणा करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. गांवचा पाटील, गांवचा इनामदार याने आपल्या शेतांत अमुक केले त्यामुळे त्यास अमुक फायदा झाला असे दिसले तर, सबंद गांवाने याचप्रमाणे करावे म्हणून ज्याला जी पाहिजे ती मदत दिली तर, आणि एकमेकांनी एकमेकांचे व सर्वांचे हित पहावयाचे असे ठरवून तसे आचरण केले तर ही शेतीसुधारणा पांच दहा वर्षांत वाटेल तितकी होईल. शेतीसुधारणेच्या मुख्य आकांक्षा दोन. (१) दरएकरी येणारे पिकाचे परिमाण वाढावे व (२) त्या पिकाचा माल जास्त चांगला, वरच्या दर्जाचा असावा, यासाठी आमच्या मते खालील तीन गोष्टी केल्या पाहिजेत. (१) शेतकऱ्याला निदान वर्षभर पुरेल इतकी अन्नवस्त्राची सोय व त्यास लागणारी बी व आयुधे, (२) ताली, विहिरी, जमीनीस पाट करणे वगैरे कायमच्या सुधारणा व त्यासाठी लागणारा पैसा.... (३) शेतीत खपणाऱ्या लोकांचा योग्य पुरवठा व इतर वेळी त्यांस पुरेसें दुसरें काम. पहिल्या सरदाराखाली रोख पैसे, कर्ज, जनावरें, बी, खते व आउतें यांचा पुरवठा; शेत कामाची तत्वे अगर रहस्य यांचे शिक्षण व शेतीत जुटीने करावयाच्या कामाची माहिती ही येतात. बियाचा पुरवठा व्हावा म्हणून निवडक दाण्याची कोठारे जागोजाग स्थापन केली पाहिजेत. जेथे कालव्याच्या पाण्याची सोय आहे तेथें रासायनिक खतांचे कारखाने काढावे. ही खतें देशांतच केली पाहिजेत, परदेशांतून विकत आणून भागणार नाही. ही नवीन खतें कचरा, मैला, मूत, शेण वगैरेंना मदत म्हणून वापरावयाची आहेत. यांच्या बदली ही वापरणे चांगले नाही. घरगुती खतांतील अर्क वायां न जाईल अशी तजवीज करण्यास शेतकऱ्यास शिकविले पाहिजे, शेतीच्या जनावरांत देखील सुधारणा झाली पाहिजे, बैल मजबूत व धिप्पाड असावेत अशी तजवीज केली पाहिजे. "वोढा नड्वान दोग्घीर्धेनूः" खांदेदार बैल व दुधाळ गाई पाहिजेत. गुरांना खाणे, वैरण, पेंड, दाणा यांची काटकसर, यांचा योग्य पुरवठा, यांची जनावरांमागे