पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०७ शेतकऱ्याच्या चरित्रांकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपणांस असे दिसेल की, तो परिस्थितीप्रमाणे फेरबदल करण्यास अगदी नाराज किंवा अगदी असमर्थ असा नाही. त्याला जी साधनें सुगम असतात, जी त्याच्या आटोक्यात असतात, अशी साधने वापरण्यांत हिंदी शेतकरी बिलकुल कसर किंवा आळस करीत नाही. त्याला शिकविणाऱ्या माणसाबद्दल त्याला विश्वास वाटला, त्याच्या प्रामाणिकपणाविषयी खात्री पटली, तो सांगतो ती गोष्ट हितकर आहे असे दिसले म्हणजे हिंदी शेतकरी त्या उपदेशाप्रमाणे बरोबर वागतो असा अनुभव आहे. यासाठी शेती सुधारण्यासाठी जे प्रयत्न करावयाचे, ज्या शाळा काढावयाच्या, ज्या पद्धती वापरावयाच्या, त्या शेतन्यांची बरोबर खात्री पटवतील अशा पाहिजेत व ही खात्री पटण्यासाठी या गोष्टी व शेतकरी यांचा नेहमी वरचेवर सबंध आला पाहिजे. इंग्रज सरकारच्या शेती संस्था व नमुनेदार शेतें ही शेतकऱ्यांशी परिचय ठेवीत नाहीत. नमुनेदार शेतावर काम करणारे शेतकरी व मजूर यांची सुद्धा त्या व्यवस्थेबद्दल शेतकी अधिकाऱ्यांना खात्री करून देता येत नाही ! नमुनेदार शेत खरोखर फायदेशीर झाले असे साऱ्या मुंबई इलाख्यांत एकसुद्धा नाही. या शेतांवर गोठे, कोठारे, यंत्रे, अधिकारी यांचा खर्च मात्र अतिशय असतो व त्या मानाने उत्पन्न मुळीच नसते. पावसाची अनुमाने काढणारी साधने व कचेन्या इंग्रज सरकारच्या इतक्या आहेत पण एका वर्षी सुद्धां अनुमान बरोबर उतरत नाही. विलायती खतांच्या इतक्या जाहिराती आपण पहातों पण त्या खतांच्या किंमतीइतकीमुद्धां उत्पन्नात वाढ अनुभवास येत नाही. अशा स्थितीत गरीब शेतकरी या गोष्टी उपयोगांत आणीत नाहीत यांत त्याचा काय दोष आहे ? । अधिकाऱ्यांमार्फत सरकारने केलेले शेतकी सुधारण्याचे प्रयत्न इतके थोडे व असले कुचकामी आहेत की, ते शेतकऱ्यांच्या काळजाला जाऊन भिडतच नाहीत. प्रयोग करणारे अधिकारी सुद्वा जेथें प्रयोग च्या फलाबद्दल साशंक, तेथे अडाणी माणसांना त्यांचा काय उपयोग ? आज कित्येक वर्षे मध्यवर्ती व नमुनेदार अशी थोडी शेती व कित्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शेतेहि सरकारी अधिकाऱ्याच्या मार्फत चालविलेली आहेत, पण त्यापैकी एकांत